
लोहारा-प्रतिनिधी
केंद्राचे ते शेतकरी विरोधी परिपत्रक रद्द करा अन्यथा २६ जुलैपासून धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करणार सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांचा प्रसिद्धी पत्रकाद्वारे इशारा.
श्री जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, ३० एप्रिल २४ रोजी केंद्र शासनाने अचानकपणे परिपत्रक काढल्याने धाराशिव जिल्ह्यातील ५७ पैकी ३२ महसूल मंडळातील एकाही शेतकऱ्यांना खरीप २०२३ च्या नुकसान भरपाई पोटी एक रुपया मिळाला नाही तसेच सरसकट पीक विमा पासून धाराशिव जिल्ह्यातील ५ लाख १९ हजार शेतकरी वंचित आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी आता आपण २५ जुलै पर्यंत वाट पाहून परिपत्रक रद्द न झाल्यास २६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करणार आहोत तसेच ७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात सर्वत्र रस्ता रोको करणार येणार असल्याचे अनिल जगताप यांनी म्हटले आहे.
या संदर्भात राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल केल्यानंतर त्यावर ४ जुलै रोजी सुनावणी झाली मात्र संसदेचे अधिवेशन संपतात १२ ऑगस्ट नंतर केंद्रातील अधिकाऱ्यासोबत बैठक लावून यासंदर्भात निकाल घेऊ असे प्रधान सचिव कृषी श्रीमती व्ही राधा यांनी सांगितले होते. १२ तारीख उलटूनही अद्याप पर्यंत केंद्राशी बैठक झालेली नाही तसेच याबाबत कुठलीही माहिती दिली जात नाही .जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत असताना त्यात आणखीनच भर म्हणून खरीप २०२३ मधील अग्रीम व्यतिरिक्त आत्तापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाहीच तसेच केंद्राच्या नवीन परिपत्रकानुसार तर ७५ टक्के शेतकरी त्यांच्या हक्काच्या पिक विमा रकमेपासून वंचित राहणार आहेत या सर्व बाबींचा विचार करून परिपत्रक रद्द होण्यासाठी आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे सर्व शेतकऱ्यांचे मत झाल्याने व जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन करण्याचं आपण ठरवलं आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातील पहिला भाग म्हणून २६ जुलै रोजी जिल्हाधिकार्यालय समोर धरणे आंदोलन तसेच सात ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व भागात रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. नंतरचे दोन टप्पे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण असे असतील त्याच्या तारखा नंतर जाहीर करू असे जगताप यांनी म्हटले आहे.
——————-–—————————————-
केंद्र शासनाने अचानकपणे काढलेल्या ३० एप्रिल २०२४ च्या परिपत्रकाने धाराशिव जिल्ह्यातील ५ लाख १९ हजार शेतकरी हक्काच्या पीक विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहणार आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून व त्यांच्यासोबत चर्चा करून तीव्र आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महसूल व पोलीस प्रशासन यांना रीतसर निवेदन देण्यात येईल परिपत्रक रद्द होईपर्यंत शेतकऱ्यांना सोबत घेऊन लढा चालूच ठेवू. आंदोलन दोन टप्प्यात असेल पहिल्या टप्प्यात २६ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन तर ७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात सर्वत्र रस्ता रोको असेल दुसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकार्यालयावर मोर्चा व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण असेल त्यांच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येतील.
अनिल जगताप
पिक विमा याचिका कर्ते