ब्रेकिंगमहाराष्ट्र
तहसिल कार्यालय तुळजापूर येथे कॅम्प आयोजित केला आहे लाभार्थी यांनी आधार कार्ड अपडेट करुन घ्यावे
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तहसिल कार्यालय तुळजापूर येथे कॅम्प आयोजित केला आहे लाभार्थी यांनी आधार कार्ड अपडेट करुन घ्यावे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरामधील विशेष सहाय्य योजनेच्या ( संजय गांधी/इंदिरा गांधी/ श्रावणबाळ योजना) लाभार्थी यांना कळविण्यात येते की ,दिनांक 01/08/2024 ते दिनांक 14/08/2024 पर्यंत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तहसिल कार्यालय तुळजापूर येथे कॅम्प आयोजित केला असून त्यामध्ये लाभार्थी यांनी आपले आधार कार्ड अपडेट करुन घ्यावे .अन्यथा अनुदानाची रक्कम पुढील महिन्यापासून दिली जाणार नाही.याची नोंद घ्यावी.
तुळजापुर येथील शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की , आजपासून खरीप हंगाम 2024 करिता शेतकरी स्तरावरून मोबाईलद्वारे ई पीक पाहणी नोंद सुरू करण्यात आली असून ,
कृपया आपण आपल्या मोबाईल मध्ये पीक पाहणी DCS व्हर्जन 3.0.2 हे ॲप डाऊनलोड करून आपल्या शेतातील पिकाची नोंद लवकरात लवकर करून घ्यावी.अशोक भातभागे,तलाठी सज्जा तुळजापूर