महात्मा बसवेश्वर पुतळा उभारणीस व परिसर विकास कामास ५ कोटी निधी द्यावा-ॲड.दिपक आलुरे

महात्मा बसवेश्वर पुतळा उभारणीस व परिसर विकास कामास ५ कोटी निधी द्यावा-ॲड.दिपक आलुरे
धाराशिव /न्यूज सिक्सर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना धाराशिव जिल्ह्यातील महात्मा बसवेश्वर पुतळा उभारणीस व परिसर विकास कामास ५ कोटी निधी द्यावा व श्री खंडोबा श्री क्षेत्र अणदूर चा तीर्थक्षेत्र विकासाचा ब वर्गात समावेश करण्यात यावा आशी मागणी- ॲड.दिपक आलुरे भाजपा जिल्हाउपाध्यक्ष,धाराशिव
महाराष्ट्रातील वीरशैव समाजाच्या उन्नतीसाठी आपण *महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची* स्थापना केली त्याबद्दल महाराष्ट्रातील वीरशैव समाज आपला सदैव ऋणी आहे महाराष्ट्रातील धाराशिव,लातूर व सोलापूर जिल्ह्यात महात्मा बसवेश्वरांच्या विचारांनी चालणारा वीरशैव समाज मोठ्या प्रमाणात असल्याचे आपण जाणताच सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यात महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा आणि परिसर विकासासाठी आपण यापूर्वी निधी उपलब्ध करून दिला आहे मात्र धाराशिव जिल्ह्यातील वीरशैव समाज महात्मा बसवेश्वरांच्या पुतळाआणि परिसर विकासासाठी गेल्या दहा वर्षापासून प्रयत्न करीत आहे.
*तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यातील समाजातील प्रमुखांनी एकत्र येऊन *महात्मा बसवेश्वर यांचा आश्वारूढ पुतळा धाराशिव जिल्ह्यामध्ये स्थापित करावा असा विचार समोर आला आणि त्यासाठी *आमदार राणाजगजित सिंह पाटील साहेब* यांनी *महात्मा बसवेश्वर* यांच्या जयंतीचे निमित्ताने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 लगत असलेली नळदुर्ग अणदूर तालुका तुळजापूर दरम्यान गोलाई येथील जागेची पाहणी करून पुतळा आणि परिसर विकास यासाठी जागा निश्चित केली सदर जागेत अश्वारूढ पुतळा,ध्यान मंदिर व उद्यान विकास झाल्यास सदरचे ठिकाण हे या परिसरातील एकमेव प्रेक्षणीय पर्यटन स्थळ होईल यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे. यासाठी निधीची आवश्यकता असून आपण *या कामासाठी रुपये पाच कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा* अशी धाराशिव जिल्ह्यातील समाजातर्फे विनंती करण्यात येत आहे.
*श्री खंडोबा श्री क्षेत्र अणदूर ता.तुळजापूर* हे अत्यंत जागृत देवस्थान आहे श्री खंडोबा आणि बानाबाईचा विवाह येथे झालेल्या हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यातील भाविक दर्शनासाठी येथे येतात दररोज आणि दर रविवारी हजारोच्या संख्येने भाविक हजेरी लावतात.
यात्रेला किमान दोन लाख भावीक उपस्थित असतात तसेच श्री खंडोबा मंदिर हे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर व श्री क्षेत्र स्वामी समर्थ अक्कलकोट व सिद्धरामेश्वर सोलापूर यांची मध्यवर्ती ठिकाण आहे त्यामुळे सर्व बाजूने भाविक येथे येतात श्री खंडोबा मंदिराच्या एकूण स्थानापैकी हे पहिले स्थान असून सुद्धा जेजुरीच्या तुलनेत या मंदिराचा विकास झाला नाही तरी *श्री खंडोबा देवस्थान अणदूर तालुका तुळजापूरचा तीर्थक्षेत्र विकासाच्या ‘ ब ‘ वर्गात समावेश करून तीर्थक्षेत्राचा विकास* करावा अशी निवेदन देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मागणी केली.