
लोहारा-प्रतिनिधी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 22 जुलै ते 28 जुलै 2024 पर्यंत शिक्षण सत्ता साजरा करायचा आहे. त्यानिमित्त शाळेमध्ये शिक्षण सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य निर्मिती केली दुसऱ्या दिवशी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस साजरा केला त्यानिमित्त विद्यार्थ्यांना भाषा खेळ व गणित खेळ हे घेण्यात आले. तिसऱ्या दिवशी क्रीडा दिवस व सांस्कृतिक दिवस साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना जे भारतीय खेळ आहेत ते घेण्यात आले लंगडी खो खो कबड्डी, लगोरी इत्यादी खेळ घेण्यात आले. चौथ्या दिवसानिमित्त कौशल्य व डिजिटल उपक्रम विद्यार्थ्यांना ई लर्निंग अध्यापनातून शिक्षण देण्यात आले. पाचव्या दिवशी शालेय पोषण दिवस साजरा करण्यात आला परसबाग व त्याची संरक्षण व प्रत्येक मातामार्फत एक झाड लावण्यात आले उपक्रम राबविण्यात आला. सहाव्या दिवसानिमित्त सर्व माताचा सहभाग शाळेमध्ये घेण्यात आला व माता पालकांची बैठक घेण्यात आली. व सातव्या दिवसानिमित्त किती भोजन हा उपक्रम ठेवण्यात आला गावातील काही व्यक्तीमार्फत पैसे जमा करून विद्यार्थ्यांना स्नेहभोजन शाळेमध्ये देण्यात आले. सर्व कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी अनंत कानेगावकर खिजर मोरवे निर्मले सुनंदा कलशेट्टी मल्लिकार्जुन यांनी केली.