
लोहारा(इकबाल मुल्ला)
भारत देशाचे कणखर, शक्तिशाली नेतृत्व नरेंद्रजी मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. लोहारा तालुका भाजपाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.9 जुन 2024 रोजी सायंकाळी एकमेकांना पेढे भरवुन, फटाक्याची आतषबाजी करुण, जयघोष करुण मोठा जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, नगरसेवक अविनाश माळी, नगरसेवक दिपक मुळे, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, ओम कोरे, भाजपा युवा मोर्चा माजी जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष बाबा सुंबेकर, भाजपा माजी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, प्रशांत माळवदकर, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष मल्लीनाथ फावडे, युवराज जाधव, भाजपा
युवा मोर्चा तालुका सरचिटणीस
सुयेश दंडगुले, भाजपा प्रशिद्धी प्रमुख
निकेश बचाटे, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, कल्याण ढगे, नयुम सवार, भिमाशंकर ताटे, सोमनाथ वडगावे, संतोष जट्टे, यांच्यासह भाजपा, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.