मराठा विद्यार्थ्यांना एस.ई.बी.सी. प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या त्रुटी दुर करा-आमदार ज्ञानराज चौगुले
Post-गणेश खबोले

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनीधी
आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन एस.ई.बी.सी. प्रमाणपत्र काढण्यासाठी येणाऱ्या अडचणी दुर करण्याची विनंती पत्रादवारे केली आहे. दि.२८ जुन रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने SEBC प्रमाणपत्र मिळण्यासाठी सुधारित शासन निर्णय लागु झाला आहे. परंतु यात आधीचा १२ मार्च रोजीचा शासन निर्णय रदद झाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नव्याने जात प्रमाणपत्र काढावे लागत आहे. एस.ई.बी.सी. प्रमाणपत्र नव्याने काढण्यासाठी सेतु सुविधा केंद्र, महा ई सेवा केंद्र आदी केंद्रांमध्ये याबाबतच्या पोर्टलवर अपडेट न झाल्यामुळे नव्याने प्रमाणपत्र मिळण्यास अनेक गैरसोयी निर्माण होत होत्या. सध्या अनेक शालेय व महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू असुन नवीन अध्यादेशाप्रमाणे एस.ई.बी.सी. प्रमाणपत्र काढताना एस.ई.बी.सी. प्रमाणपत्र निवडले असता त्यावर जातीचा पर्याय दिसुन येत नव्हता. त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांची ही समस्या सोडविणेबाबत छावा क्रांतिवीर सेना, उमरगा यांच्या वतीने आमदार ज्ञानराज चौगुले यांना निवेदन देण्यात आले होते. या अनुषंगाने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान दि.०९ रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन मराठा विद्यार्थ्यांना एस.ई.बी.सी. प्रमाणपत्र काढताना येणाऱ्या अडचणी दुर करण्याची विनंती केली आहे. यानुसार मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित विभागास निर्देश दिले आहेत.