श्री. रामनवमी उत्साहात साजरी– धर्म,तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान यांचा सुंदर संगम
Post-गणेश खबोले

*श्री. रामनवमी उत्साहात साजरी. – धर्म, तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान यांचा सुंदर संगम!*
लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील धानुरी येथे दिनांक 6 एप्रिल
हनुमान मंदिर येथे श्री. रामनवमीचा पवित्र उत्सव मोठ्या उत्साहात व धार्मिक श्रद्धेने साजरा करण्यात आला. या प्रसंगी सद्गुगुरू बबनजी महाराज (उंडरगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रेरणादायी सुधारित स्वरूपातले प्रवचन आयोजित करण्यात आले, त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व तत्वज्ञान यांची सांगड घालून “जीवन जगण्याची कला आत्मसात करण्याचे आव्हान उपस्थित भाविकांसमोर ठेवले.
या कार्यक्रमास जय हनुमान भजनी मंडळ व श्री. संत मारुती महाराज भजनी मंडळ, धानुरी यांचे सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विवेकोदय कोचिंग क्लासेस, धानुरी येथील विद्यार्थी श्रुती सुर्यवंशी,सृष्टी,किरण,सुरज यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परमेश्वर साळुंके, शिवदास साळुंके, अंगद सुरवसे, लक्ष्मण बाबर, दत्तात्रेय जाधव, दत्तात्रेय लोहटकर, दिनकर बाबर, गणेश सिधेश्वर साळुंके, आकाश राम पाटील, बालाजी लिबाजी जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.
संपूर्ण वातावरण भक्तिमय व आनंदमय झाले होते. गावातील एकतेचा व सांस्कृतिक जिव्हाळ्याचा एक उत्तम नमुना या उत्सवात पाहायला मिळाला.