तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील ग्रामपंचायत व अधिकार्याच्या संगणमताने भूखंड ( प्लॅट ) ची विक्री केली
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील ग्रामपंचायत व अधिकार्याच्या संगणमताने भूखंड ( प्लॅट ) ची विक्री केली
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील सर्व्हे न. 187 पैकी क्षेत्र 07 हे 27 आर चे क्षेत्राबाबत श्रीमती. शशिकला दत्तात्रय दहिहांडे, रा. भवानी रोड, तुळजापूर यांनी रहिवाशी प्रयोजनासाठी सुधारित रेखांकन मंजूर करणे बाबत दिलेला अर्जाबाबत व रेखांकनास अंतिम मान्यता नसताना प्लॉट विक्री केले बाबत दि.७ जून रोजी नगर रचनाकार , नगर रचनाकार कार्यालय, धाराशिव यांना सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनात असे नमूद केले आहे की, मौजे सिंदफळ, येथील सव्हें न. 187 पैकी क्षेत्र 07 हे 27 आर चे क्षेत्रावावत सुधारित रेखांकन मंजूरी बाबत आपल्या कार्यालयाने जा.क्र. मौजे सिंदफळ /स.नं. 187 पै / रेखांकन / उस्मानाबाद /346 दि. 10/03/2016 रोजी तहसीलदार यांच्याकडे पत्राव्दारे कळविले होते. तसेच श्रीमती शशिकला दत्तात्रय दहिहांडे यांनी वर नमूद विषयातील रेखांकनास अंतिम मान्यता नसताना देखील काही भूखंड विक्री केलेले आहे, जे की चुकीचे व बेकायदेशीर आहेत. तसेच शशिकला दत्तात्रय दहिहांडे यांनी त्यांच्या रेखांकनातोल भूखंड विक्री करणार नसल्याबाबत दि. 16/10/2015 रोजी शपथपत्र दाखल केलेले आहे. असे असताना देखील त्यांनी दि. 13/06/2016 रोजी दस्त क्रं. 2230/2016 अन्वये शुभम सुरेशराव झाडपिडे यांना भूखंड क्रं. 24 एकूण क्षेत्रफळ 165 चौ.मी. खली जागा विक्री केलेली आहे,तसेच शशिकला दत्तात्रय दहिहांडे यांना दि. 10/03/2016 रोजी नगर रचनाकार धाराशिव यांनी दिलेल्या पत्राच्या मुद्दा क्रं. 5 प्रमाणे रस्ते, गटारी व खुली जागा महसुल विभागाकडे रु. 1/- नाममात्र किंमतीत अंतिम मान्यता मिळाल्यानंतर हस्तांतरीत करण्याऐवजी दि. 13/12/2012 रोजी दस्त क्रं. 3865/2012 अन्वये ग्रामपंचायत सिंदफळ यांना हस्तांतरीत केले. सदर ले-आऊट ती अंतिम मान्यता आहे असा दर्शवून काही सहाय्यक संचालक नगर रचनाकार यांनी प्लॉट ची विक्री केलेली आहे, जे की दिलेल्या मान्यतेनुसार नसून चुकीचे व बेकायदेशीर विक्री केलेली आहे.
प्रत्यक्षात शशिकला दत्तात्रय दहिहांडे यांनी जागेवर पक्या दगडाच्या साहय्याने करून त्याची फेर मोजणी करून संबंधीत उपअधिक्षक भूमी अभिलेख खात्याकडून करून घेवून तो नकाशा अंतिम मंजूरी साठी सादर करणे आवश्यक होते. परंतू अंतिम मान्यता न घेताच त्यांनी मोजे सिंदफळ येथील सर्व्हे नं. 187 मधील काही भूखंड बेकायदेशीर रित्या विक्री केलेले आहेत.
तसेच मोजे सिंदफळ येथाल ग्रामपंचायत कार्यालयाने देखील सदर प्रकरणात दाखल केलेल्या कागदपत्रांची शहानिया न करता ग्रामसभा घेवून नगर रचनाकार धाराशिव यांनी दिलेल्या पत्राच्या मुद्दा क्रं. 5 प्रमाणे रस्ते, गटारी व खुन्नी जागा महसुल विभागाकडे रु. 1/- नाममात्र किंमतीत अंतिम मान्यता मिळाल्यानंतर हस्तांतरीत करण्याऐवजी दि. 13/12/2012 रोजी दस्त क्रं. 3865/2012 अन्वये ग्रामपंचायत सिंदफळ यांनी वेकायदेशीर रित्या हस्तांतरीत करुन घेतले.
सदर प्रकरणो शशिकत्ना दत्तात्रय दहिहांडे यांनी नगर रचनाकार धाराशिव यांच्या दिलेल्या अटी व शर्तीचं तसेच शासनाने घातलेल्या शर्तीचे उल्लंघन केलेले असल्याने वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात सखोल चौकशी करुन संबंधतीतावर योग्य तो कायदेशीर कारवाई करावी.असे आले की निवेदनात नमूद केले आहे या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते अमील शिवाजी जाधव यांची स्वाक्षरी आहे.
.