
लोहारा-प्रतिनिधी
जेवळी (ता लोहारा) येथील श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक हंबीरराव कदम यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्निक सत्काराचा कार्यक्रम पार पडला.
जेवळी (ता लोहारा) येथील श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक हंबीरराव कदम हे आपल्या ३१ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. सोमवारी (दि.१) श्री बसवेश्वर विद्यालयाच्या कार्यक्रम मंचावर त्यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेवळी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक भुसणे हे होते. या प्रसंगी संस्थेचे सचिव ॲड प्रदीप पणुरे, सहसचिव प्रा. बसवराज पणुरे, खजिनदार इराप्पा डिग्गे, उपसरपंच बसवराज कारभारी, काँग्रेसचे श्यामसुंदर तोरकडे, संस्थेचे संचालक एम एस गोसावी, एस डी आरबळे, अप्पासाहेब हावळे, प्राचार्य आर टी राठोड, मुख्याध्यापक दयानंद भुजबळ, पर्यवेक्षक एम वाय भोसले, माजी प्राचार्य दयानंद कापसे, बी एम येळमेली, डी बी खडके, महादेव चौधरी, ए डी वाघमारे, माजी मुख्याध्यापक यादव कांबळे, हरी गाडेकर, दिगंबर पिंगळे, सुरेश दंडगुले, दत्तात्रय गाडेकर, सर्जेराव कदम, सुभाष तेजगुडे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शुभांगी हेबळे तर आभार बसवराज म्हेत्रे यांनी मानले