
शंकरराव जावळे पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय लोहारा येथे मराठीचे ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे. यावेळी प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे पाटील यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी प्राचार्य साहेबांनी सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. तसेच डॉ. रामहरी सुर्यवंशी व प्रा.दत्ता कोटरंगे यांनी कुसुमाग्रज व मराठी भाषा यांच्या वर आपले विचार मांडले. याप्रसंगी श्री.मनोज पाटील,प्रा डॉ.विनायक पाटील, डॉ.मनोज सोमवंशी, प्रा.डॉ.बालाजी राजोळे, प्रा. भैरवनाथ मोटे,डॉ. विनोद आचार्य, डॉ. शिवाजी कदम,डॉ. रामेश्वर धप्पाधुळे., डॉ.छाया कडेकर, डॉ.पार्वती माने, प्रा. नितीन अष्टेकर,डॉ.सुर्यकांत बिराजदार, प्रा. प्रियंका गिरी, श्री. नंदकुमार माने, संजय फुगटे, प्रकाश राठोड, परमेश्वर कदम, आदी कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.