
मुरूड /रायगड :-अमूलकुमार जैन
पालखी मिरवणूक व वेशभूषा करून मुरुड करांच्या डोळ्यांचे पारणे फेडले….
मुरुड, भंडारवाडा युवक कार्यकर्त्यांनी शिवजयंती उत्सवानिमित्त पालखी सोहळा उत्साहात साजरा केला. तसेच महाराजांच्या व मावळ्यांच्या वेशभूषा करून व मुलींनी सुद्धा पारंपरिक वेशभूषा करून भव्य मिरवणूक मुरुड शहरातून काढून शहरातील लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आहे.
आज १९ फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुरुड भंडारवाडा युवक कार्यकर्त्यांनी प्रथमच भव्यदिव्य अशा महाराजांच्या पालखी सोहळ्याचे व शोभायात्रेचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधीवत पुजा करुन श्रीफळ वाढवून कार्यक्रमास सुरुवात केली. त्यानंतर महाराजांच्या पुतळ्याची पालखी मिरवणूक काढण्यात आली.
ही मिरवणूक भंडारवाडा येथून निघून श्री काळभैरव मंदिर रातून बाजारपेठ व पुन्हा भंडारवाड्यात येऊन सांगता करण्यात आली. ही मिरवणूक यशस्वी होण्यासाठी सर्व भंडारी युवक कार्यकर्त्यांनी खुप मेहनत घेतली आहे.