आचारसंहिता काळामध्ये बांधकाम कामगारांच्या सर्व कामाचे ऑनलाईन पोर्टल चालू ठेवावे -आनंद भालेराव
Post-गणेश खबोले

राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी एस चोकोलिंगम यांना निवेदन सादर.
धाराशिव-प्रतिनिधी
संपूर्ण राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतर एकतर्फी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांनी बांधकाम कामगारांची सर्व कामे करणे बंद केलेली आहेत.यासाठी त्यांनी कसलीही परवानगी निवडणूक निर्णय अधिकारी यांची घेतलेली नाही.असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली असता समजले.
याबाबत कामगार विभागाचे उपसचिव दादासाहेब खताळ यांची मंत्रालयामध्ये भेट घेत. सर्व ऑनलाईन कामे आहेत ती बंद करण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी दोनच दिवसांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करीत असल्याचे सांगितले.
राज्यातील 2022 मधील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळेस मुख्य निवडणूक उप आयुक्त यांनी बांधकाम कामगारांचे ऑनलाइन पोर्टलचे काम बंद ठेवण्याची आचारसंहितेमध्ये आवश्यकता नसते असा निर्णय देऊन सुद्धा स्वतःच्या लहरीप्रमाणे विवेक कुंभार यांनी सर्व कामे बंद करून राज्यातील 30 लाख बांधकाम कामगारांचे नुकसान करणे चालू ठेवलेले आहे
दरम्यान महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव कुंभार यांनी बांधकाम कामगारांचे महत्त्वाची कामे बंद ठेवून कंत्राटदारांचे भरे करणारे कामे मात्र सुरू ठेवलेली आहेत.या प्रकारे विवेक कुंभार यांनी आचारसंहितेचे भंग केलेला आहे म्हणून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान विवेक कुंभार यांनी महाराष्ट्रातील पंधरा लाख बांधकाम कामगारांचे अर्ज जाणीवपूर्व प्रलंबित ठेवलेले आहेत याबद्दलही त्यांच्यावर कारवाई करावी.
तसेच अशीही मागणी करण्यात आली की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर आयएएस अधिकाऱ्यांची सचिव म्हणून नेमणूक करावी.
वरील सर्व अन्यायाविरुद्ध आणि बांधकाम कामगारांना न्याय मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सर्व संघटनांच्या वतीने रीट पिटीशन दाखल करण्याचाही उपस्थित सदस्यानी निर्णय घेतलेला आहे.
महाराष्ट्रातील विविध बांधकाम कामगार नेते,अध्यक्ष स्वतंत्र मजूर जनरल कामगार संघटना तथा भाजपा कामगार मोर्चा प्रदेश सचिव आनंद भालेराव,मनीष गौरखेडे,रवी पवार,तानाजी गायकवाड, सुरज भालेराव इत्यादींचा शिष्टमंडळामध्ये समावेश होता.