
लोहारा (प्रतिनिधी)
राजर्षी शाहू महाराज वृध्द साहित्यिक व विविध कार्यक्षेत्रातील कलाकार गेल्या अनेक महिन्यापासून बैठकीच्या प्रतिक्षेत असुन ते उतरत्या वयात मानधनापासुन वंचित आहेत याकडे पालकमंत्री लक्ष देतील अशी चर्चा जिल्ह्यातील वृध्द कलावंतातुन केली जात आहे.
१६ मार्च २०२४ पासून काही बदल करून कार्यान्वित करण्यात आली आहे. महागाईच्या तुलनेत कलावंतांचे मानधन तुटपुंजे असल्याची ओरड होती.पुर्वी अ, ब, क, श्रेणीनुसार मानधन दिले जात होते त्याची राज्य शासनाने दखल घेऊन राज्यातील विविध कार्यक्षेत्रातील वृध्द साहित्यिक कलावंतांना सरसकट प्रति महिना पाच हजार रुपये मानधन दिले जात आहे.परंतु जिल्ह्यातील कालावंतानी गेल्या अनेक महिन्यापासून हे प्रस्ताव तालुका स्तरावर पंचायत समितीकडे दाखल केले असता तो प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठवला जातो त्याची छालनी करून पात्र कलावंतांना पत्राद्वारे मुलाखतीस बोलवले जात होते. परंतु नवीन शासनाच्या आदेशानुसार आता ते सर्व रेकॉर्ड समाजकल्याण खात्याने पंचायत विभागाकडे वर्ग केले असले तर कारवाई मात्र जि. प पंचायत विभागाकडुन होताना दिसत नाही. पंचायत समिती विभाग म्हणते आधीच कामाचा बोजा असुन कलावंतांचा प्रस्ताव घेण्यास चक्क नकार आहे. लोकसभा निवडणुक आचारसंहिता लागण्यापूर्वी समाजकल्याण खात्याने तारीख फिकस करून पात्र कलावंतांना मुलाखत पत्र पाठवले होते. लागलीच आचारसंहिता लागू झाल्याने ती मिटींग रद्द झाल्याने कलावंतातुन तिवृ नाराजी व्यक्त केली जात आहे.त्यात समाजकल्याण व पंचायत विभागाच्या कचाट्यात जेष्ठ कलावंत अडकले असुन पुर्वीप्रमाणेच समाजकल्याण खात्याकडे कारभार द्यावा तसेच पालकमंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी तात्काळ मिटींग घेण्याचे आदेश द्यावे अशी मागणी वृध्द कलावंतातुन केली जात आहे.