
तुळजापूर येथे रविवारी हिंदू गर्जना सभा
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
हिंदूराष्ट्र सेनेच्या वतीने तुळजापूर येथे रविवारी दिनांक २३ जुलै २०२३ रोजी हिंदू गर्जना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला संबोधित करण्यासाठी हिंदूराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय भाई देसाई हे प्रमुख वक्ते म्हणून येणार आहेत.
हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने जिल्हयाचे नाव पूर्ववत धाराशिव करण्यासाठी मोठे जनआंदोलन उभे करण्यात आले होते, त्यामुळे जिल्ह्याचे नाव पूर्ववत झाल्यानिमित व समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हिंदू गर्जना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत समान नागरी कायद्याची गरजे आणि त्याचे महत्व या संदर्भात प्रमुख वक्ते मा. धनंजय भाई देसाई मार्गदर्शन करणार आहेत.
ही सभा रविवार, दि.२३/०७/२०२३ रोजी सायंकाळी ६ : ०० वाजता श्री शिवपार्वती मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली असून सकल हिंदू समाजाने या हिंदू गर्जना सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदू राष्ट्र सेना व सकल हिंदू बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.