ब्रेकिंग
तुळजापूर उंडरगाव बसच्या फेऱ्या वाढवा,लोहारा पर्यंत बस सुरू करण्याची मागणी….
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील उडरंगाव ते तुळजापूर बस सेवा सुरू आहे. त्या प्रमाणे तुळजापूर ते उडरंगाव बस च्या फेऱ्या दिवसातून सकाळी साडे आठ, दुपारी एक सायंकाळी पाच वेळेत सुरू आहे तरी यात वाढ करावी ती शनिवार रविवार देखील सुरू ठेवावी तसेच लोहारा तालुक्याचे ठिकाण असल्याने नागरिकांना एक ही बस लोहारा येथे जाण्यासाठी नाही तरी तुळजापूर उडरंगाव मार्गे लोहारा बस सुरू करावी अशी मागणी उडरंगाव ग्रामपंचायत आणि नागरिकांनी तुळजापूर बस आगार प्रमुख यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदना वर उपसरपंच हिराचंद मोरे, बबन महाराज,बलभीम रवळे,व्यंकट सुर्यवंशी,राम गगणे,नागनाथ घोडके,सुनील वाघमारे आदी सह मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.