मागासवर्गीय समाजाचे वैचारिक प्रबोधन होणे गरजेचे चर्मकार समाज मेळाव्यात आमदार शिंदे यांचे प्रतिपादन

मागासवर्गीय समाजाचे वैचारिक
प्रबोधन होणे गरजेचे
चर्मकार समाज मेळाव्यात आमदार शिंदे यांचे प्रतिपादन
सोलापूर/न्यूज सिक्सर
मागासवर्गीय समाजाचे वैचारिक प्रबोधन होणे गरजेचे आहे त्यातून समाजात क्रांती घडू शकते असे प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.
शनिवारी, डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात राष्ट्रीय चर्मकार महांसघ सोलापूर यांच्यातर्फे आयोजित मेळाव्यात शिंदे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप हे होते. यावेळी भाजपच्या अनुसुचित जाती आयोगाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे, महासंघाचे राष्ट्रीय महासचिव ज्ञानेश्वर कांबळे, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मनिष निकाळजे, प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड, युवक प्रदेश कार्याध्यक्ष संजय शिंदे, माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारी, अजित गायकवाड, पद्माकर काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिंदे म्हणाल्या, विधीमंडळात अनुसुचित जाती-जमाती समितीच्या माध्यमातून काम करताना समाजातील अनेक प्रश्न समजून घेता आले. मागासवर्गातील समाजबांधवांनी आत्मविश्वासाने पुढे आले पाहिजे. शासनाच्या विविध योजना समजून घेणे गरजेचे आहे. आपला हक्काची निधी आपण वापरले पाहिजे असेही ते म्हणाल्या.
घोलप म्हणाले, चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून प्रशासकीय सेवेत दाखल व्हावेत. पंजाब आणि हरियाणामध्ये जाण्यास खूप आनंद होतो कारण त्या राज्यामध्ये 500 आयपीएस व आयएएस यांची निवड झाली तर त्यामध्ये चर्मकार समाजाचे पाचशे मागे दोनशे विद्यार्थी या पदावर त्यांची निवड होते. जोपर्यंत इच्छाशक्ती निर्माण होत नाही तोपर्यंत आपले दारिद्य्र कायमचे जाणार नाही. समाजाचे नाव मोठे झाले तर माझे उर भरुन येईल अशी भावना घोलप यांनी व्यक्त केली.
यावेळी नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गौरव शिंदे यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम कबाडे यांनी केले. सूत्रसंचालन सूवर्णा कटारे यांनी तर आभार अजय राऊत यांनी मानले.
यावेळी अजय राऊत, गणेश तुपसमुद्रे, परशुराम मग्रुमखाने, शिवपुत्र वाघमारे, शावरप्पा वाघमारे, अशोक सुरवसे, राजेंद्र कांबळे, इस्माईल हुलसुरे, प्रदीप घागरे, सरफराज कांबळे, अरविंद तळ्ळे, अरुण शिंदे, भगवान वनस्कर आदी उपस्थित होते.
चौकट
समाजभूषण पुरस्काराने गौरव
या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभाग उपयअभियंता राजशेखर जेऊरकर, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, अॅड, संजीव सदाफुले, व्यापारी सिद्धाराम चाबुकस्वार, प्रगतीशील शेतकरी दत्ता गवळी, मधुकर गवळी यांचा समाजभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.