
धाराशिव -प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक धाराशिव अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतुनअपर पोलीस अधीक्षक गोहर हसन यांच्यातर्फे जिल्ह्यातील गुन्हेगारीकडे वळालेल्या समाजबांधवांना गुन्हेगारी पासून परावृत्त करुन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पहाट” उपक्रमाचे दि. २३.०२.२०२४ रोजी पोलोस अधीक्षक कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमामध्ये शेती असणाऱ्या समाजबांधवांना कृषी विभाग व ग्लोबल विकास ट्रस्ट यांचेकडून विवीध फळबाग,पीके लागवडी संबंधी शासनाच्या योजनांबाबत माहिती देण्यात आली. तसेच फळबाग,विवीध पिके यांचे लागवडी करीता आवश्यक असणारे वातावरण,जमिनीचा पोत,फळझाडांच्या विवीध जाती याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.त्यानंतर शेती नसणाऱ्या समाज बांधवांना पशुसंवर्धन विभाग,धाराशिव येथील अधिकाऱ्याकडून जिल्हा परिषद,राज्यशासन,केंद्रशासन यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विवीध पशुपालनाच्या योजनांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये गाई, म्हशी, कुक्कुटपालन, शेळीपालन बाबत सविस्तर माहिती देवून योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व कार्यपध्दतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये आदिवासी विकास विभागातील अधिकाऱ्यामार्फत त्यांच्या विभागातर्फ राबविण्यात येणा-या विवीध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कार्यक्रमामध्ये आधारकार्ड अद्यक्त करण्याची सुविधा पुरविण्यात आल्या.
अश्याप्रकारे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग,आदिवासी विकास विभाग,पशुसंवर्धन विभाग,ग्लोबल विकास ट्रस्ट यांच्या मार्फतीने जवळपास १०० समाजबांधवाना शासनाच्या विवीध लोककल्याणकारी योजनांबाबत माहिती देऊन त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त होण्यासाठी आवाहन करण्यात आले, कार्यक्रमास गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे,वाचक सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे,कृषी विभाग,आदिवासी विकास विभाग,पशुसंवर्धन विभाग,ग्लोबल विकास ट्रस्ट चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.