
मुरूम (डॉ रामलिंग पुराणे)
मुरूम येथील किसान चौकातील शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दि.१९ फेब्रुवारी पासून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत, दि.१९ रोजी रक्तदान शिबिर संपन्न झाले, दि.२० वार सोमवार रोजी मुरूम येथील अशोक चौक ते अक्कलकोट रोडवरील ज्युनिअर कॉलेज आणि धुम्मा शेतापर्यंत किसान मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा ०३ किलोमीटर व ५ किलोमीटर अंतराचे होते. प्रारंभी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून स्पर्धेचे सुरुवात झाले. या स्पर्धेत मुला-मुलींचा उत्स्फूर्तपणे सहभाग होता. राम कांबळे, पोलीस कर्मचारी महानुरे,सुधीर चव्हाण,राहुल वाघ,अजय वेदपाठक, दिलीप शेळके,राजू मुल्ला, सूरज कांबळे, रामहरी अंबर, भगत माळी, रवी चौधरी,किरण गायकवाड,आनंदकुमार कांबळे,रामकृष्ण अंबर, राजकुमार वाले आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मॅरेथॉन स्पर्धेत ०३ किलोमीटर अंतरात आदर्श अंकुश मंडले यांनी प्रथम क्रमांक पटकावले त्यांना उपविभागीय पोलीस आयुक्त विजयकांत सागर यांच्या वतीने देण्यात येणारे रु.५०००/- व मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. द्वितीय विजेते महेश कल्लेश्वर मंडले यांना अरविंद तानाजी फुगटे यांच्या वतीने देण्यात येणारे पारितोषिक रक्कम रु.३१००/- व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. ०५ किलोमीटर अंतरावरील प्रथम विजेते अखिल अविनाश जाधव यांना शरण पाटील मित्र मंडळाचे वतीने देण्यात येणारे पारितोषिक रु. ५०००/- व मेडल मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. द्वितीय आलेल्या स्पर्धकास तानाजी चंद्रकांत लेंडवे यांना कै. मनकर्णिका अंबर यांच्या समरणार्थ अखिलेश अंबर यांच्या तर्फे ३१००/- रु व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. मुलींमधून उत्तेजनार्थ पारितोषिक कु. माके नंदिनी,कु. सुभद्रा दासे यांना अजय वेदपाठक यांनी प्रत्येकी ५००/- रु व मेडल देऊन सन्मानित केले. या स्पर्धेत छोट्या चिमुकल्याचा उत्स्फूर्तपणे सहभाग होता या स्पर्धकास शरणप्पा धुम्मा यांनी रोख रक्कम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मुरूम सह उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातून विविध गावातील असंख्य मूल-मुली,तरुण वर्गानी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. अतिशय खेळीमय वातावरणात मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाले. शिवजन्मोत्सव समिती व विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. पोलीस प्रशासन,ग्रामीण रुग्णालय रुग्ण वाहिका,नगर परिषद कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून सहकार्य केले. राष्ट्रगीताने किसान मॅरेथॉन स्पर्धेचे समारोप झाले.