राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी जळकोटचे उपसरपंच प्रशांत नवगिरे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी जळकोटचे उपसरपंच प्रशांत नवगिरे
जळकोट/न्यूज सिक्सर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार, प्रदेशाध्यक्ष सुनिलजी तटकरे यांच्या मान्यतेने, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार व धाराशिव जिल्हाध्यक्ष मा . महेंद्र (काका ) धुरगुडे यांनी काल दि . २० रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तथा जळकोट गावचे उपसरपंच प्रशांत नवगिरे यांची धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘ जिल्हाउपाध्यक्ष ‘ या पदावर नियुक्ती केली असुन त्याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार व धाराशिव जिल्हाध्यक्ष महेंद्र (काका ) धुरगुडे यांनी नवगिरे यांना दिले . यावेळी पक्षाचे जेष्ठ नेते गोकुळ (तात्या ) शिंदे, धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे, तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष संदीप भैय्या गंगणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .