न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

हाॅटेल माईलस्टोनचे आमदार राणा पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात उद्घाटन संपन्न

हाॅटेल माईलस्टोनचे आमदार राणा पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात उद्घाटन संपन्न

तुळजापूर/न्यूज सिक्सर

लातूर येथील हाॅटेल नर्तकीचे मालक श्री प्रभाकर शेट्टी,रत्नाकर शेट्टी व दिनेशचंद्र शेट्टी बज्जाल यांच्या मालकीचे मौजे बोरी,
तुळजापूर-धाराशिव हायवे रोडलगत श्रीक्षेत्र तुळजापूर पासून ५ कि.मी.अंतरावरती असणारे निसर्गरम्य हाॅटेल माईलस्टोनचे उद्घाटन तुळजापूर विधानसभेचे आमदार तथा माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटिलसाहेबांच्या हस्ते नुकतेच पार पडले.यावेळी धाराशिव शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम,पाळकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंखे,लातुरचे माजी नगराध्यक्ष विक्रमसिंह चौहान,धाराशिव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धिरज भैय्या पाटील,भाजपाचे उमरगा विधानसभा निवडणूक प्रमुख राहुल पाटील सास्तुरकर,उ.बा.ठा.शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शाम पवार,शिवाजी बोधले,यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी प्रभाकर शेट्टी, रत्नाकर शेट्टी, दिनेशचंद्र शेट्टी,दिनेश गंभीरे ,किरण स्वामी या सर्वांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून सत्कार केला. यानंतर आमदार राणादादा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.तुळजा भवानी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी,तुळजापूरातील खवैय्येसाठी हॉटेल माईलस्टोन हे अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. कारण या हॉटेलमध्ये ग्राहकांना सर्वसेवा सुविधा व कुटुंबांना बसण्यासाठी प्रशस्त व्यवस्था करण्यात आलेली आहे.यामुळे याचा प्रवासी भाविकांना मोठा लाभ होणार आहे असे सांगुन हॉटेलला शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविक दिनेश गंभीरे यांनी केले आभार प्रभाकर शेट्टी यांनी मानले. यावेळी तुळजापूरसह लातूर येथील नागरिक व देवी भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे