
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल संस्थाचालक संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरडे तर उद्घाटक म्हणून भाजपा उमरगा – लोहार विधानसभा प्रमुख राहुल पाटील,नगराध्यक्षा वैशालीताई खराडे,उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नेते अभिमान खराडे,संस्थेचे अध्यक्ष डॉ सुहास भोसले,कौडगावचे सरपंच बालाजी भोसले,नगरसेविका शामलताई माळी,अश्विनी कळसकर,संचालिका माधुरी जयराम चोबे,शिवराज झिंगाडे,सतिश गिरी, अभिजीत जाधव आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलेची देवता नटराज व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले.शॉल व स्मृतिचिन्ह भेट देवून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावर्षी न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलचे दशकपुर्ती वर्ष आहे.
स्कुलचे संस्थापक तथा प्राचार्य श्री शहाजी जाधव यांनी प्रास्ताविक मांडले.त्यांनतर विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर करून कार्यक्रमला सुरुवात केली. हिंदी मराठी गीता वर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ.शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नाटकाच्या माध्यमातून सादर केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कुलमधील शिक्षक – शिक्षिका सिद्धेश्वर सुरवसे, व्यंकटेश पोतदार, प्रेमदास राठोड,मिस पुजा चौरे,माधवी होगाडे,अनिता मनशेट्टी,ईश्वरी जमादार,मीरा माने,अर्चना सोणके,सरिता पवार,चांदबी चाऊस,रेश्मा शेख,शीतल बिराजदार तसेच कर्मचारी वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिस सविता जाधव व मिस सोनाली काटे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.यशवंत चंदनशिवे यांनी व्यक्त केलेयाप्रसंगी पत्रकार,कला प्रेमी,पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.