
पोलिसाचा विरोधात पोलीस अंगरक्षक सामील
तुळजापूर : प्रतिनिधी
राजेंद्र दिगंबर माने व त्यांचा अंगरक्षक पोलीस हे रात्री गुटका वाहतूक करणारी वाहने अडवून मोठी रक्कम वसूल करीत असल्याबाबत दिनांक 11 जून रोजी सामाजिक कार्यकर्ते दिगंबर पांडुरंग जाधव यांनी पोलीस अध्यक्ष अतुल कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले आहे
निवेदनात असे नमूद केले आहे की,तुळजापूर येथील सराईत गुन्हेगार राजेंद्र दिगंबर माने हे गेल्या कित्येक महिन्यापासून त्यांच्यासोबत असलेला पोलीस अंगरक्षक यांना सोबत घेऊन रात्री दहा वाजता धाराशिव रोड वर जाणाऱ्या वहानांना अडवून पैसे वसूल करीत आहे
तसेच गुटखा वाहतुक करणाऱ्या वाहाने आडवून त्यांना केसची भीती घालून त्यांच्याकडून मोठी रक्कम घेऊन तोडी करीत आहे सदर प्रकारचा माने व त्यांचा पोलीस अंगरक्षकाचा बऱ्याच दिवसापासून गोरख धंदा चालू आहे माने यांच्या भीतीपोटी कोणीही दखल घेत नाही दिनांक 22 / 5 / 2024 रोजी रात्री राजेंद्र माने व त्यांचा पोलीस अंगरक्षक धाराशिव रस्त्यावर वाहने अडवून पैसे वसुलीच्या कामासाठी गेले होते त्या रात्री ११:०० वा च्या सुमारास ते वाहनाचा पाठलाग करीत असताना एक्सीडेंट झाला त्यात त्यांचा पोलीस अंगरक्षक जखमी झाला वरील व्यक्ती हा पोलीस अंगरक्षकाच्या गेल्या कित्येक महिन्यापासून गैरवापर करून लोकांचे वाहने आडवून अमाप पैसे वसूल करण्याचा गोरख धंदा बेधडक चालू आहे वरीलल राजेंद्र माने यांच्या पोलिसाचा धाखदाखवून पैसे गोळा करण्याच्या या व्यवसायातून दिनांक 22/5 / 2024 रोजी अपघात झाला त्याचा गुन्हा पण राजेंद्र माने यांनी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे दाखककेला केला वरील व्यक्ती हा गेल्या कित्येक दिवसापासून पोलीस अंगरक्षकाचा गैरकामासाठी वापर करून पैसे उकळत आहे तरी वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ सखोल चौकशी करून रात्रीच्या वेळी पोलीस अंगरक्षकाचा गैरवापर करून वाहने आढळून पैसे रोखणाऱ्या माने व त्यांचा त्यांचा पोलीस अंगरक्षकावर गुन्हा दाखल करावा असा इशारा निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना देण्यात आला आहे.