येवती जिल्हा परिषद शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी समाधान ढोले यांची निवड

येवती जिल्हा परिषद शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी समाधान ढोले यांची निवड
येवती /न्यूज सिक्सर
तुळजापूर तालुक्यातील येवती गावचे युवा नेते समाधान ढोले यांची जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येवती शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड
येवती गावचे युवा नेते सदैव कामास अग्रेसर असणारे, कार्य तत्पर, दिलखुलास व्यक्तिमत्व समाधान तानाजी ढोले यांची जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येवती च्या शालेय समिती व्यवस्थापनाच्या अध्यक्षपदी (दि.10) निवड करण्यात आली.
समाधान ढोले हे पोलीस मित्र महासंघ धाराशिव चे जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तुळजापूर चे तालुका कार्याध्यक्ष, स्वराज्य प्रतिष्ठान येवती गाव चे अध्यक्ष तसेच तंटामुक्त समिती येवती गावचे उपाध्यक्ष म्हणून सध्या उत्कृष्ट जबाबदारी पार पाडत आहेत. या सर्व पदांचा त्यांना दांडगा अनुभव असून पुढील काळात शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे याचा शाळा व्यवस्थापनाला नक्कीच फायदा होणार आहे.
शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्यावतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.