श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय बंद होणार नाही – आनंद कंदले यांची माहिती
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय बंद होणार नाही – आनंद कंदले यांची माहिती
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अभियांत्रिकी महाविद्यालय कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, त्याला जोडून श्री तुळजाभवानी स्किल विद्यापीठ निर्माण होत आहे त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये अशी माहिती भाजप युवा मोर्चा अध्यक्ष आनंद कंदले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या भाजपा कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, माजी उपनगराध्यक्ष सुहास साळुंखे, नरेश अमृतराव भाजपा शहराध्यक्ष शांताराम पेंदे यांची उपस्थिती होते या पत्रकार परिषदेमध्ये युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद कंदले व माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय बंद होणार नाही याविषयी कोणीही शंका घेऊ नये तसेच आमदार राणाजगजितसह पाटील हे तुळजाभवानी स्किल विद्यापीठ या महाविद्यालयाला जोडून निर्माण करीत आहेत अशी माहिती दिली. अभियांत्रिकी, एम बी ए बी एस सी आर्किटेक आयटीआय आणि वेगवेगळे डिप्लोमा कोर्सेस या विद्यापीठामार्फत चालवले जाणार आहेत ज्याच्यामुळे आपल्या भागातील मुलांना कौशल्य विकास शिक्षण मिळणार असून त्यामधून नोकऱ्या मिळणार आहेत. या विद्यापीठामुळे तुळजापूरच्या दर्जा वाढेल आणि जगाच्या पातळीवर सुरू असलेले अभ्यासक्रम विद्यार्थ्याला शिकता येतील, राजकीय भावनेने केलेल्या आरोप चुकीचे आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविद्यालय बंद होणार नाही असा दावा आनंद कंदले यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आला. जर महाविद्यालय बंद होणार असेल तर त्याला माझा पहिला विरोध असेल असे याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.