ब्रेकिंगमहाराष्ट्र
‘शासन आपल्या दारी’ या योजने अंतर्गत अनुसूचित जमाती व भटक्या जमाती मधील नागरीरीकांना विविध प्रकारचे दाखले वाटप – तलाठी अशोक भातभागे
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी , तुळजापूर

‘शासन आपल्या दारी’ या योजने अंतर्गत अनुसूचित जमाती व भटक्या जमाती मधील नागरीरीकांना विविध प्रकारचे दाखले वाटप – तलाठी अशोक भातभागे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर येथे ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना विविध सरकारी योजना आणि सेवांचा लाभ देण्यात येणार आहे.या योजनेनेचा वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने अनुसूचित जमाती व भटक्या जमाती मधील लोकांना तुळजापूर येथे आधार कार्ड , जातीचे दाखले, रेशनकार्ड, मतदान कार्ड,मतदान ओळखपत्र वाटप करण्यात आले या उपक्रमांतर्गत तहसील कार्यालय,नायब तहसिलदार पांचाळ ,मंडळ अधिकारी अमर गांधले ,तलाठी अशोक भातभागे तलाठी सजा तुळजापूर यांनी यावेळी पत्रकार ज्ञानेश्वर गवळी यांच्याशी बोलताना सांगितले.