
लोहारा/प्रतिनिधी
महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या समर्थकांना घाम फुटला आहे, त्यांच्या भाषेचा स्तर घसरला आहे. त्याला कारण ठरले आहे त्यांच्या उमेदवाराचा ठळकपणे दिसणारा पराभव. त्यातूनच मग मराठा समाजात संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे, मात्र हा डाव मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेबांनी आधीच हाणून पाडला आहे. अनुसूचित जातीसाठी आरक्षित मतदारसंघात आपण कोणतीही भूमिका घेणार नाही, आपल्याला पाठिंबा देणाऱ्यांना साथ देणार, असे जरांगे पाटील साहेबांनी जाहीर केले आहे. उमरगा-लोहाऱ्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी यापूर्वीच अंतरवाली सराटीला जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या भूमिकेला पाठिंबा जाहीर केला आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आणि समर्थकांना हळद खाऊन लगेच पिवळे होऊ असे वाटत आहे. मराठा आरक्षण आंदोलनात शिवसेनेचे युवा नेते किरण गायकवाड यांनी सुरुवातीपासून महत्वाची भूमिका बजावली आहे. काल पक्षात येऊन, निष्ठावंतांना डावलून महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवलेले उमेदवार आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या त्यांच्या समर्थकांच्या डावाला मराठा समाज बळी पडणार नाही, मराठा समाज त्यांचे मनसुबे उधळून लावत ज्ञानराज चौगुले यांच्या पारड्यात वजन टाकणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.