
लोहारा-प्रतिनिधी
बुधभूषणकार,संस्कृतपंडित,विक्रमवीर,गुणवान,शीलवान, शक्तवीर, साहीत्यकार, स्वराज्यरक्षक ,शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा करीत लोहारा तालुक्यातील हिप्परगा सय्यद येथे ३६७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या दरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी संभाजी ब्रिगेड लोहारा तालुका प्रमुख बालाजी भागवत यादव,हिप्परगा (सय्यद) उपसरपंच गुरूनाथ यादव, धनराज गिरी,महादेव कोटमाळे, सोमनाथ भोंडवे,अनिल भोजराव ,आकाश यादव, महेश भोजराव,अभिषेक जाधव,समित कोटमाळे,ज्ञानेश्वर भोजराव, लक्ष्मण लोहार, आविष्कार यादव, अमित कोटमाळे, प्रशांत गादे, गोविंद मंडोळकर, सचिन पाटील,सैदोबा वाकडे,अभिषेक भारती,आनंद गिरी,संकेत यादव,सोमनाथ निर्मळे,शंभु भारती, उपस्थित होते