आज हजारोंच्या संख्येने आझाद मैदान मुंबई येथे सकल मराठा समाज उपस्थित राहणार – योगेश केदार
वनवास यात्रा

आज हजारोंच्या संख्येने आझाद मैदान मुंबई येथे सकल मराठा समाज उपस्थित राहणार – योगेश केदार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
एक दिवस जाती साठी… आज शेकडो बांधव उपस्थित झाले होते. आज 17 जुलै रोजी हजारोंच्या संख्येने आझाद मैदान मुंबई येथे सकल मराठा समाजाने उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव मुंबईत दाखल होत आहेत. आता तर न्यायालयाने देखील आपल्याला परवानगी दिली आहे. आज पासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात आपल्या ओबीसी आरक्षण मागणीला मान्यता मिळून त्याचा कायदा पारित करून घ्यायचा असेल तर आझाद मैदानात ताकद उभी करणे गरजेचे आहे. मराठा समाजाचा आरक्षण संदर्भातला वनवास मिटला पाहिजे असे वाटत असेल तर आपण आवर्जून आझाद मैदानावर या. सगळी कामे बाजूला ठेऊन एक दिवस जातीसाठी. जातीच्या अस्तित्वासाठी या. सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित,मराठा वनवास यात्रा यांनी आव्हाण केले आहे.