शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी एकरी दहा हजार रुपयाची मदत तात्काळ देण्यात यावी मनसेची मागणी

शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी एकरी दहा हजार रुपयाची मदत तात्काळ देण्यात यावी मनसेची मागणी
तुळजापूर /न्यूज सिक्सर
तहसील कार्यालय तुळजापूर
विषय: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी व सावकारी पैसा तून मुक्तीसाठी शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी (हंगामनिहाय) एकरी १०,००० रु.ची मदत तात्काळ देण्यात यावी.
संपूर्ण जगात भारताची कृषी प्रधान देश म्हणून ओळख आहे मात्र या कृषीप्रधान देशातील बळीराजाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून जगाचा पोशिंदा असणारा हा शेतकरी निसर्गाचा लहरीपणा,विविध प्रकारची नैसर्गिक संकटे,मदत करताना शासनाची अनास्था या सर्व बाबी लक्षात घेता मोठ्या गर्तेत सापडला आहे.वर्षानुवर्ष शेती हा तोट्याचा धंदा करत आलेल्या जगाच्या पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याची अवस्था अत्यंत वाईट झाल्याने शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असून मराठवाड्यात दिवसाला किमान २ शेतकरी आत्महत्या होत आहेत.दिवसेंदिवस वाढत चाललेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आणि त्यांची सावकारी पाशातून मुक्तीसाठी शेतकऱ्यांना पेरणीपूर्व एकरी १० हजार रुपयाची मदत तात्काळ द्यावी.अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या बाबतीत झोपेचं सोंग घेतलेल्या शासनाला जागे करण्यासाठी आणि हा निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
महेश जाधव उपजिल्हाध्यक्ष
मल्लिकार्जुन कुंभार तालुकाअध्यक्ष
गणेश पाटील तालुका सरचिटणीस
मयूर गाढवे विधानसभा अध्यक्ष
धनाजी साठे सचिव
प्रशांत गरड विभागध्यक्ष
आकाश पवार तालुका उपाध्यक्ष,
राहुल गायकवाड तालुका उपाध्यक्ष,विशाल माने शहर उपाध्यक्ष
ऋषी माने शहराध्यक्ष विद्यार्थ्यां सेना व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते