पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक
लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
उस्मानाबाद/न्यूज सिक्सर
पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद उस्मानाबाद या कार्यालयाकडून सन 2023-24 या आर्थिक वर्षात विविध योजनेसाठी दिनांक 13 जून 2023 ते दिनांक 12 जुलै 2023 या कालावधीत अर्ज मागणी करण्यात येत आहे. यामध्ये (01) अनुसुचित जातींच्या लाभार्थींना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे (2) दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम ) वैरण बियाणे वाटप करणे. दिनांक 12 जुलै 2023 नंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी आपल्या कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकिय दवाखाने, पशुधन विकास अधिकारी (वि,) पंचायत समिती येथे संपर्क साधावा अर्जाचा विहित नमुना, मार्गदर्शक सुचना, नियम, अटी व सोबत जोडावयाची कागदपत्राची सुची पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती सर्व उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत . तसेच एन.आय.सी.(Osmanabad.nic.in) या संकेतस्तळावर अर्जाचे नमुने उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.तरी जास्तीत जास्त लाभार्थींनी उक्त योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी केले आहे.