देशी बनावट पिस्टल बाळगल्या प्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक;एक आरोपी फरार
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

देशी बनावट पिस्टल बाळगल्या प्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक;एक आरोपी फरार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
पिस्टल बाळगल्या प्रकरणी तुळजापूर तालुक्यातील कामठा ते वरवंटी कडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर उस्मानाबाद पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली.त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन तलवार, वेरना फोरव्हिलर निदर्शनास आली.ही कारवाई सोमवारी दि.८ जुन रोजी ७ वाज न्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद यांनी केली. एक अरोपी अटक तर एकून १४ लाख १५ हजार वाहनासह जप्त केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्र. एक यांने आपल्या कब्जात एक लोखंडी देशी बनावटीचे पिस्टल, ज्याचे बॅरेल ६ इंच मुठ २ इच लांबीची , मॅगझीन ३.५ इंच तसेच लोखंडी दोन तलवारी व एक काळया रंगाची वेरना कंपनीची कार बाळगलेली मिळुन आली
अरोपी ओमकार प्रदिप कांबळे, रा. हडको मात्र सध्या मुक्काम काक्रंबा, आरोपी जमीर सय्यद रा. कामठा , दोन आरोपी मधून एक आरोपी पळुन गेला अमोल रमेश निंबाळकर हेड कॉन्स्टेबल स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद यांच्या फिर्यादीवरून दि.९ रोजी पहाटे ३ च्या सुमारास गुरन – २३२/२३ कलम ३/२५,४ /२५ शस्त्र अधिनियम -१९५९ प्रमाणे तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास पोनिरिक्षक काशीद यांच्या आदेशाने ग्रेड पोलिस उप निरिक्षक कदम यांचेकडे देण्यात आला CMS नोंदनी केली आहे.