
लोहारा (प्रतिनिधी)
लोहारा तालुक्यातील आष्टा मोड येथील प्रशालेत उमरगा लोहारा परिसरातील प्रसिद्ध दिवंगत डॉ.के.डी.शेंडगे यांच्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत तालुक्यातील
राजेगाव येथील शरद पवार विद्यालयातील इयत्ता १० वर्गातील विद्यार्थी प्रणव दत्ताजी चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावित २१०० रुपये व प्रमाणपत्र मानकरी झाला.
त्या निमित्ताने शाळेत त्यांचा सत्कार राजेगाव गावाचे प्रथम नागरिक सुरेश ज्ञानोबा देशमुख,शाळेय समिती अध्यक्ष भाऊसाहेब देशमुख,जेष्ठ शिक्षक शिंदे सर,कोरे सर, सारोळे सर महाजन मॅडम उपस्थितीत करण्यात आला.