तुळजापूर तालुक्यातील भातंब्री येथे आज शेतरस्ता खुला करून देणार !
ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

तुळजापूर तालुक्यातील भातंब्री येथे आज शेतरस्ता खुला करून देणार !
तुळजापूर : प्रतिनिधी
जिल्हयामध्ये विशेष मोहिम राबवून प्रत्येक तालुक्यामध्ये शेतरस्ते मोकळे करण्याबाबतची मोहिम राबविण्यात आली होती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने पोलिस बंदोबस्तात शेतरस्ते खुले करून दिले होते. त्याच प्रमाणे तुळजापूर तालुक्यातील भातंब्री येथे दि. २३ रोजी खुला करून देणार !
जिल्ह्यातील दोन वर्षा पासून शेतरस्ते
अदालतीच्या माध्यमातुन मोठया प्रमाणावर शेतरस्ते मोकळे करणे व शेतरस्ता उपलब्ध नसलेल्या शेतक-यांना नवीन शेतरस्ता खुला करून देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंम्बासे यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर तालुक्यातील भांतब्री येथे गेल्या दोन तीन वर्षापासून प्रत्यक्षात हे शेतरस्ते मोकळे करण्याबाबतचे आदेश होवुन ही रस्ते अतिक्रमीत अथवा आडविलेले असल्याचे शेतक-यांच्या तक्रारीव्दारे व निवेदनाव्दारे निदर्शनास आले होते.अतिक्रमण केलेला आहे तो शेतरस्ता तहसिलदार सौदागर तांदळे यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी यादव व तलाठी पाटील हे पोलिस प्रशासनाच्या बंदोबस्तात दि.२३ मे रोजी ११:०० वा. सुमारास शेतरस्ता खुला करून देण्यात येणार आहे.
तहसिलदार सौदागर तांदळे यांनी रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधुन पोलीस बंदोबस्तातात रस्ता मोकळा करण्याबाबत विहीत कार्यपध्दतीप्रमाणे कार्यवाही करावी. असेही या आदेशात म्हटले आहे.