हद्यपारीच्या न्यायप्रविष्ठ प्रकरणात खोटया मजकूराचे शपथपत्र देवून कोर्टाची दिशाभुल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा – विशाल छत्रे
विशाल छत्रे

हद्यपारीच्या न्यायप्रविष्ठ प्रकरणात खोटया मजकूराचे शपथपत्र देवून कोर्टाची दिशाभुल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा – विशाल छत्रे
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर येथील विशाल छत्रे यांचे हद्यपारीच्या न्यायप्रविष्ठ प्रकरणात सुनावणीमध्ये खोटया मजकूराचे शपथपत्र देऊन गंभीर गुन्हा केल्याबाबत दि.१० मे रोजी उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांना विशाल विजयकुमार छत्रे, यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनात असे नमूद केले आहे की,तुळजापूर येथे विशाल छत्रे विरुध्द कोर्टात हद्यपारीबाबत क्रं.२०२० / दंडणीय / हद्यपार /कावि-१८५८ / सी आर -५ हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. वरील नमूद न्यायप्रविष्ठ प्रकरणात सुनावणी चालु असताना राजेंद्र दिगंबर तुळजापूर यांनी प्रस्तुत प्रकरणाशी काही संबंध नसताना तृतीय पक्ष म्हणून प्रस्तुत प्रकरणात नोटराईज्ड शपथपत्र दाखल केले. सदर शपथपत्र दाखल करणार यास हद्यपार प्रकरणात सुनावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसताना देखील त्याने खोटया मजकुराचे खोटे कथन नमुद करुन शपथपत्र दाखल केले. त्या शपथपत्रामध्ये नमुद केलेल्या खोटया मजुकरावरुन मा. न्यायालयाचे अर्जदाराबद्यलचे मत बदलुन तो खराच गुंड आहे असा क्लेश तयार व्हावा अशा वाईट उद्येशाने बनावट शपथपत्र माने यांनी सादर केले.शपथपत्रामध्ये छत्रे यास सन २०१३ मध्ये एम. पी. डी.ए. मध्ये १ वर्ष विभागीय अधिकारी कारागृहात डांबुन ठेवले असा खोटा व तथ्यहीन मजकूर नमुद केला. वास्तविक प्रस्तुत छत्रे एम.पी.डी.ए.कायदयांतर्गत कोणत्याही न्यायालयाने १ वर्ष डांबुन ठेवलेले नव्हते. परंतु शपथपत्र देणार राजेंद्र दिंगबर माने याने केवळ मा. न्यायालयाचे छत्रे यांचे मतपरिवर्तन होऊन तो गुंड असून त्याच्यापासून लोकांच्या जीवीतास धोका आहे या निर्णयास येऊन त्यास हद्यपार करावे या उद्देशाने खोटे, बनावट मजकुराचे शपथपत्र न्यायालयीन प्रकरणात सुनावणीमध्ये दाखल केले आहे. शपथपत्र राजेंद्र दिगंबर तुळजापूर यानी मा. न्यायालयात खोटया मजकुराचे शपथपत्र दाखल केल्या मुळे मा.न्यायालयाची फसवणूक तसेच विश्वासघात केलेला आहे. तरी मा. न्यायालयाने खोटया मजकूराचे नोटराईज्ड शपथपत्र दाखल करणाऱ्या राजेंद्र दिगंबर माने यांच्यावर न्यायप्रक्रियेमध्ये खोटे शपथपत्र दाखल केल्या प्रकरणी मा. कोर्टाने याची दखल घेऊन माने यांच्यावर गंबीर गुन्हा दाखल करावा या निवेदनावर विशाल विजयकुमार छत्रे यांची स्वाक्षरी आहे.