
लोहारा (प्रतिनिधी)
ऑल इंडिया केमिस्ट ड्रगिस्ट अधक्ष जगनाथ आप्पा शिंदे यांचा ७५ व्या वाढिवसानिमित्त लोहारा शहरातील भारत माता मंदिरात दि.२४ रोजी धाराशिव जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो जिल्हा अधक्ष धनाजी आनंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
जनकल्याण समिती चे संघ प्रचारक शंकर जाधव यांचा हस्ते आयुर्वेद देवता धन्वंतरी व भारत माता यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.यावेळी मा पंचायत समिती सदस्य मा दिपक रोडगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्ती पूजन करण्यात आले.यावेळी धाराशिव जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो सदस्य भरत सुतार,लोहारा तालुका अध्यक्ष प्रमोद बंगले,गणेश सारंग,निखिल माशाळकर ,गणेश हिप्परगेकर,सत्यवान दबडे महेश खबोले,हरिभाऊ पवार,अनिल यलोरे,विकास होंडराव,विशाल जावळे,पद्मसिंह पाटील,सुहास इगोले,विक्रम जावळे आकाश शिंदे,कृष्णा घोडके,अबेद खानापुरे,प्रा शहाजी जाधव,दत्तात्रय दडगुले यांच्या सह शहर व इतर तालुक्यातील मेडिकल असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.