नंदगाव येथील श्री.महात्मा बसवेश्वर यात्रेत पशुप्रदर्शनास मोठा प्रतिसाद

नंदगाव येथील श्री.महात्मा बसवेश्वर यात्रेत पशुप्रदर्शनास मोठा प्रतिसाद
यात्रेनिमित्त कुस्ती फड,लावणी, व्याख्यान अशा विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे करण्यात आले होते आयोजन
लोहगाव/न्यूज सिक्सर
तुळजापूर तालुक्यातील नांदगाव येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतीवर्षाप्रमाने याहि वर्षी श्री.महात्मा बसवेश्वर यात्रा महोत्सव कमेटीच्या वतीने विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये पशुप्रदर्शन, जंगी कुस्ती फंड,लावणी, व्याख्यान,सह अनेक सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये पशुप्रदर्शनास मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 50 ते 60 बैलजोडी विक्री खरेदी झाली असून पन्नास लाखांची उलाढाल झाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
मंगळवार (दि.25)रोजी सायंकाळी 5 वाजता ठेर ओढणे कार्यक्रमानंतर महाप्रसाद वाटपाने यात्रेची सांगता होणार आहे.तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.