शासकीय सेवेत नियुक्त उमेदवार व पोलीस पाटील यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार

उस्मानाबाद / प्रतिनिधी
पोलीस ठाणे नळदुर्ग च्या वत्तीने सन २०२३ मध्ये पोलीस ठाणे नळदुर्ग हद्दीतील शासकीय सेवेत नियुक्ती झालेल्या ३५ उमेदवार व त्यांचे पालकांना पोलीस ठाणे येथे बोलावून तसेच पोलीस ठाणे नळदुर्ग हद्दीतील उत्कृष्ट काम करणारे ०८ पोलीस पाटील यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सई भोरे पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा रोटरी क्लब उमरगाचे प्रविण स्वामी यांच्या हस्ते दि. २७.०५.२०२३ रोजी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ठ काम करणारे पोलीस पाटील यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देवुन सत्कार करण्यात आला. तसेच शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या उमेदवार प्रविण रामचंद्र हांडगे,ज्योती सुधाकर लोहार,अतुल बबन कांबळे, प्रिया रासाहेब बंडगर, जिवण उत्तम घंटे,सारिका दत्ता माळी,नवनाथ शिवाजी दबडे,जिजा विठोबा कांबळे,ऐश्वर्या शशिकांत गवळी,सरस्वती राजेंद्र चव्हाण,चांद शेखर पिंजारी,प्रशांत बब्रुवान शिरगिरे,आण्णा नेताजी शिरगिर,श्रीशैल्य सिद्राम बिराजदार,विक्रम आप्पाराव सावंत, संदीप केशु राठोड, अजय संजय सोनकांबळे,तुकाराम गणपत पाटील,पुनम हरीलाल लोंढे,प्रिया रावसाहेब बंडगर,सोमनाथ शंकर हिंगमिरे,पुजा अर्जुन जगदाळे,सुजित विठ्ठल भोसले,आस्मा जावेद पठाण,विक्रम व्यंकट सावंत,नानासाहेब देविदास सावंत,आबासाहेब तुकाराम शिरगिरे, लक्ष्मी मारुती शिवकर,चैतन्य गणेश लांडगे,राधा प्रकाश बिराजदार,भैया देविदास जांभरे,मोहसिन कुरेशी,सचिन बेले,अक्षय जाधव,देविदास राठोड तसेच पोलीस ठाणे नळदुर्ग हद्दीतील उत्कृष्ठ काम करणारे पोलीस पाटील गजेंद्र मच्छिदू कोणाळे, भागवत शंकर भालशंकर,देविदास हरीदास चव्हाण,बेबी रतन रेड्डी,बसवेश्वर काशिनाथ सांगवे,अमोल दत्तात्रय हिप्परगे,विनोद गुंडेराव सलगरे,नरेश अरविंद जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक उस्मानाबाद अतुल कुलकणों, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील सामाजिक कार्यकर्ते तथा रोटरी क्लब उमरगाचे प्रविण स्वामी पोलीस ठाणे नळदुर्ग प्रभारी सिध्देश्वर गोरे, पिराजी तायवाडे व पोलीस ठाणे नळदुर्ग येथील पोलीस अंमलदार उपस्थितीत होते.