गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
भोळसर असल्याचा फायदा घेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

भोळसर असल्याचा फायदा घेऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
बेंबळी /न्यूज सिक्सर
एका गावातील एक 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 14.04.2023 रोजी 16.00 वा.सु.घरी असताना गावातील एका तरुणाने सदर मुलगी ही भोळसर असल्याचा फायदा घेवुन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास त्याने ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतेची आईने दि.15.04.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, (2)(l),354, 354(b), 342 सह पोक्सो कायदा कलम 4, 6, 8, 10, 12 , अपंग कायदा कलम 92(डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.