न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

प्रियकराने २ लाख रुपयासाठी अपहरण केलेल्या सात वर्षाच्या बालकाची 24 तासात अपहरणकर्त्याच्या तावडीतुन सुखरूपपणे सुटका तीन आरोपींच्या नळदुर्ग पोलिसांनी  आवळल्या मुसक्या 

प्रियकराने २ लाख रुपयासाठी अपहरण केलेल्या सात वर्षाच्या बालकाची 24 तासात अपहरणकर्त्याच्या तावडीतुन सुखरूपपणे सुटका
तीन आरोपींच्या नळदुर्ग पोलिसांनी  आवळल्या मुसक्या

 

नळदुर्ग/न्यूज सिक्सर
प्रियकराने २ लाख रुपयासाठी अपहरण केलेल्या सात वर्षाच्या बालकाची अपहरणकर्त्याच्या तावडीतुन सुखरूपपणे सुटका करून नळदुर्ग पोलिसांनी त्या बालकाला आईच्या स्वाधीन करण्याबरोबरच अपहरण केलेल्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, ता.३१ जानेवारी रोजी सोलापुर येथील चौगुले कुटुंब विवाह सोहळ्यासाठी काटगाव ता. तुळजापुर येथे आले होते. विवाह सोहळा संपल्यानंतर चौगुले कुटुंबातील स्वराज यलप्पा चौगुले हा सात वर्षाचा मुलगा गायब झाल्याचे चौगुले कुटुंबियांच्या लक्षात आले.त्यांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली मात्र स्वराज कुठेच सापडला नाही. त्यातच अपहरत मुलाच्या चुलत्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला यामध्ये तुमच्या मुलाचे अपहरण करण्यात आले असुन त्याला सोडवायचे असेल तर २ लाख रुपये किरण आणि अपहरत मुलाच्या आईजवळ देऊन त्यांना पाठवुन द्या अशाप्रकारचा मेसेज आल्यानंतर रात्री दहा वाजता चौगुले कुटुंब नळदुर्ग पोलिस ठाण्यात येऊन याबाबतची तक्रार दिली.
नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी या तक्रारीची दखल घेऊन याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे–पाटील यांना दिली. यानंतर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सिद्धेश्वर गोरे यांनी या अपहरण प्रकरणाचा तपास सुरू केला. यामध्ये अपहरणकर्त्यांनी ज्या मोबाईल नंबरवरून २ लाख रुपये खंडणी मागण्याचा मेसेज पाठविला होता त्या नंबरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो नंबर हायटेक वर्चुअल असल्याचे निदर्शनास आले. या नंबरचा लवकर शोध लागत नाही. सपोनि सिद्धेश्वर गोरे यांनी या तपासासाठी पोलिसांची दोन पथके तयार करून या प्रकरणाचा तपास सुरू केला.यावेळी या अपहरण प्रकरणामागे किरण अविनाश लादे वय २५ वर्षे रा. सारोळे ता. मोहोळ जि. सोलापुर हा असल्याचे स्पष्ट झाले. ज्या नंबरवरून मेसेज आला होता त्या नंबरचा शोध सुरू असताना पहिल्यांदा तो अक्कलकोट येथे असल्याचे समजले त्यानंतर त्याचे लोकेशन सोलापुर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असल्याचे निदर्शनास आले. आरोपींच्या शोधासाठी नेमण्यात आलेल्या पथकाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पहाटे चार वाजता अपहरण कटातील मुख्य आरोपी किरण अविनाश लादे वय २५ वर्षे याला पोलिसांनी मोहोळ येथुन ताब्यात घेऊन त्याला नळदुर्ग पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सकाळी सहा ते नऊ पर्यंत पोलिस किरण कडे चौकशी करीत होते मात्र तो त्याला दाद देत नव्हता. शेवटी पोलिसी खाक्या दाखविताच किरण याने अपहरण केल्याची कबुली दिली.व अपहरण केलेल्या स्वराज याला माझा मित्र किशोर शाहीर तांदळे रा. हरिबोर ता. मिरज, जि. सांगली याच्याकडे ठेवले असल्याचे सांगितले. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे–पाटील व सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पवनकुमार अंधारे, पोकॉ विशाल सगर, अविनाश दांडेकर असे पथक सांगलीकडे रवाना केले. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे, पोकॉ गोरख शिंदे व तांबोळी यांचे दुसरे पथक तयार करून तेही तपासासाठी रवाना केले. सांगलीला रवाना झालेले पथक सांगली येथे गेल्यानंतर तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेऊन किशोर शाहीर तांदळे वय २८ वर्षे रा. हरिबोर ता. मिरज, जि.सांगली याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अपहरत मुलासबंधी विचारले असता किशोर याने सदरील मुलाला सुनिल सदाशिव हजारे वय ३२ रा. रामनगर, सहावी गल्ली सांगली यांच्याकडे ठेवले असल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ किशोर तांदळे यास सोबत घेऊन सुनिल हजारे याच्या घरी जाऊन पीडित मुलाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. अशाप्रकारे नळदुर्ग पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात फिल्मीस्टाईलने अपहरण करून २ लाख रुपये खंडणी मागणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळुन अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेऊन त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्याचे कौतुकास्पद काम केले.मुलाच्या अपहरण कटातील मुख्य आरोपी किरण अविनाश लादे याचे पीडित मुलगा स्वराज यलप्पा चौगुले याच्या आईसोबत प्रेमसबंध होते. पीडित मुलाची आई एक वर्षांपासुन नवऱ्यापासुन वेगळे राहत आहे. तीनच दिवसांपुर्वी ती विवाह सोहळ्यासाठी आली होती. किरण लादे याने पीडित मुलाच्या आईवर केलेला खर्च तिच्याकडूनच वसुल करून झालेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी हे मुलाचे अपहरण केले असल्याचे समोर आले आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा अपहरणाचा डाव आरोपींवरच उलटला आहे.आरोपी किरण अविनाश लादे, किशोर शाहीर तांदळे व सुनिल सदाशिव हजारे यांच्याविरोधात नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं.५३/२०२३ कलम ३६४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तीनही आरोपींना अटक करण्यात आली. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पिराजी तायवाडे हे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे