
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील वडगाव गां येथील मुस्लीम समाज बांधवांच्या वतीने आ. ज्ञानराज चौगुले यांच्याकडे शादिखाना बांधणे व फणेपुर येथील येथील मुस्लिम कब्रस्तानला संरक्षण भिंत बांधणे साठी निधी मंजूर करणे बाबतची मागणी करण्यात आली होती. त्याअनुषंगाने आ. ज्ञानराज चौगुले यांनी अल्पसंख्याक विकास योजनेमधून मौजे.वडगाव येथे शादीखाना बांधणे 50 लक्ष व फणेपूर येथील मुस्लिम कब्रस्तानास संरक्षण भिंत बांधणे साठी 30 लक्ष रुपये निधी मंजूर करून घेतला आहे. या कामाचे आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.13 ऑक्टोंबर 2024 रोजी भूमिपूजन संपन्न झाले. सदर कामे मंजूर केल्याबद्दल दोन्ही गावातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आ.ज्ञानराज चौगुले यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या आयोजित कार्यक्रमात आ.चौगुले बोलताना म्हणाले की, मी नेहमी माझ्या मतदारसंघाचा विकास करण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्नशील राहतो. त्याचे फलित म्हणून गेल्या अडीच वर्षात मतदार संघातील मोठ्या व छोट्यातील छोट्या गावाला सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून घेण्याचा यशस्वी पाठपुरावा मी केलेला आहे. यातील बहुतांश कामे पूर्ण झाली आली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. भविष्यातही मतदारसंघाचा असाच विकास सुरू ठेवण्याकरिता सुजान जनता मला पुनश्च विधानसभेत पाठवेल असा विश्वास व्यक्त करत कोणत्याही अडी-अडचणीतील व्यक्तीची मदत करताना त्याचा धर्म, जात किंवा पंथाचा मी कधीही विचार केला नाही व यापुढेही करणार नाही. जे कोणी त्याच्या कामाकरिता माझ्याकडे येईल त्याचे काम करण्याचे मी प्रामाणिक प्रयत्न करनार असल्याचे यावेळी उपस्थितांना सांगितले. या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, लोहारा न.पं.उपनगराध्यक्ष आयुब शेख, माजी नगरसेवक अभिमान खराडे, नगरसेवक अविनाश माळी, अमीन सुंबेकर, वडगाव उपसरपंच बबन फुलसुंदर, भागवत दनाने ग्रा.स.सतीश पाटील, माजी उपसरपंच लक्ष्मण भुजबळ, ज्ञानेश्वर भुजबळ, तुकाराम फुलसुंदर, शेटीबा पवार, मिलिंद गायकवाड, बाळाराम साळुंखे, सोसायटी चेअरमन बिबीशन पवार, मजहर सय्यद, अहमद शेख, शंकर पाटील, शाखाप्रमुख विलास फुलसुंदर, अरुण जगताप, नय्युम सवार, मैनुद्दीन सय्यद, अमीर अली सय्यद, आदम सय्यद, कुरबान सय्यद, हुसेन सय्यद सय्यद, मोहसीन सय्यद, हाजी सय्यद, हाफीज सय्यद, सलीम सय्यद, गुंडू शेख, मदार सय्यद, बिलाल सय्यद, रब्बानी शेख, जावेद शेख, शाहरुख शेख, दस्तगीर सय्यद, मोहद्दीन सय्यद, महबूब सय्यद, अहमद शेख, नवाब शेख व फणेपूर येथील राजेंद्र माळी, सरपंच शोभा सगर, उपसरपंच दत्तात्रय काळे, माजी सरपंच नारायण निमशेट्टी, पोलीस पाटील राजकुमार माळी, शाखाप्रमुख यादव जाधव, मुबारक मुल्ला, आयुब मुल्ला, अबीर मुल्ला, दगडू मुल्ला, अजहर मुल्ला, महबूब मुल्ला, फतरू जमादार, जशुदिन जमादार, हुसेन मुल्ला, अल्ताफ मुल्ला, निजाम मुल्ला, खबुला मुल्ला, लायक मुल्ला, सिराज मुल्ला, नजीर मुल्ला आदी मुस्लिम बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राजेंद्र माळी यांनी आ.चौगुले यांनी विविध विकास कामे केल्याची सविस्तर माहिती सांगीतली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक बबन फुलसुंदर व सुत्रसंचालन बसवराज माशाळकर यांनी केले तर आभार आयुब सय्यद यांनी मानले.