न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

अत्याधुनिक संसाधनांचा अंतर्भाव असणारी एकमेव डिजिटल शाळा  — तहसीलदार अरविंद बोळंगे

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

अत्याधुनिक संसाधनांचा अंतर्भाव असणारी एकमेव डिजिटल शाळा

 — तहसीलदार अरविंद बोळंगे

 तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनः र्निरीक्षण या कार्यक्रमांतर्गत घरोघरी अधिकारी या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी न. प. शा. क्र.3 तुळजापूर (खु.) येथील बूथ क्र.182आणि 183 ला भेट दिली.

यावेळी लोकसहभागातून समृद्धीकडे जाणाऱ्या या शाळेत सामाजिक बांधिलकी जोपासत रेणुका पेंट्स चे मालक रमेश भोजने यांनी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी दिलेल्या बायोमॅट्रिक मशीनचे उदघाटन तहसीलदार साहेबांच्या हस्ते करण्यात आले.

   शाळेत उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सुविधा, शाळेला लाभलेले ISO नामांकन,सौर ऊर्जेवर चालणारी संयंत्रे,इन्टेरेक्टिव्ह बोर्ड, C. C.TV कॅमेरे, संगणक कक्ष, सुसज्ज प्रयोगशाळा, निसर्गरम्य परिसर, शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून खूप समाधान व्यक्त केले. मी पाहिलेली ही न. प. ची एकमेव डिजिटल व आदर्श शाळा असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी मा. उपनगराध्यक्ष पंडितराव जगदाळे, नायब तहसीलदार .एम. डी. पांचाळ, मंडळ अधिकारी अमर गांधले, दत्ता नन्नवरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. लक्ष्मीताई रणजित भोजने, सदस्य भगवान सुरवसे सर, रमेश भोजने,शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मोटे, अशोक शेंडगे, श्रीम. निर्मला कुलकर्णी, सतीश यादव, जालिंदर राऊत, विश्वजीत निडवंचे BLO महेंद्र पाटील, BLO मुळे सर, श्रीम. प्रणिता भोरे, श्रीम. ज्योती ताटे, श्रीम.अमृता रोकडे, श्रीम. कल्पना व्हटकर, माने, कांबळे, देडे आणि वॉर्डातील नागरिक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे