न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञोत्सवातील पूर्वतयारीची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या कडून आडवा बैठक

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञोत्सवातील पूर्वतयारीची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या कडून आडवा बैठक

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी साडेतीन पिठा पैकी पूर्ण पीठ मानले जाणारे आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोउत्सवानिमित्त तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंम्बासे व जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी घेतली आढावा बैठक

श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञोत्सवातील महत्त्वाच्या गर्दी च्या दिनी दोन लाख भाविक येतील असे गृहीत धरुन नियोजन केले जात असल्याची माहीती श्री तुळजाभवानीमंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंम्बासे व जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी पञकार परिषदेत माहिती दिली. श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञोत्सवाचा सोमवार दि २५ रोजी सप्टेंबर रोजी पंचायत समिती तुळजापूर येथील सभागृहात आढावा घेतल्यानंतर पञकारांशी बोलताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले कि शुक्रवार दि ६ आँक्टोबर देविजींची मंचकीनिद्रा रविवार दि १५ आँक्टोबर घ टस्थापना रविवार दि २९ मंदीर पोर्णिमा हे या नवराञोत्सतील महत्वाचे गर्दी होणारे दिवस असणार आहेत मागील शारदीय नवराञोत्सवातील अनुभव लक्षात ञुटी दूर करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे मंदीर प्रशाषण पोलिस आरोग्य नगरपरिषद एस टी महावितरण हे प्रमुख विभाग या नवराञोत्सवासाठी अंत्यत महत्त्वाचे आहेत या विभागातील सर्व मंडळीना आज बोलवले होते त्यांच्या कडुन पुर्वतयारीचा आढावा घेतला .यंदा खाजगी वाहनांनी येणाऱ्या भाविकांची पायपीठ कमी व्हावीयासाठी चार ते पाच वाहनतळे मंदीर जवळ म्हणजे हाडको उध्दवराव पाटील सभागृह येथे उभारले जाणार आहेत येथुन भाविकांना मंदीर जवळ पडणार आहे हे भरल्या नंतर बाह्य वानतळात वाहने लावले जावेत असे नियोजन आहे.

महाराष्ट्र व कर्नाटक परिवहवन महामंडळांना तात्पुरते बसस्थानक उभारावेत अशा सुचना केल्या आहेत मागील वर्षी गर्दी दिवशी दीड लाख भाव व चाळीस ते पन्नास हजार च्या आसपास वाहने आले होते या दीड लाख भाविकातील ऐंशी हजार भाविकांनी मंदीरात जावुन दर्शन घेतले तर सत्तर हजार भाविकांनी प्रदक्षणा कळस व महाध्दार मधुन दर्शन घेतल्याने यंदा दोन लाख भाविक येथील असे गृहीत धरुन नियोजन केले आहे.तसेच शहरात सुचना व दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहे तीन भाषेत कन्नड तेलगु मराठीत अंनाऊसिंग केली जाणार आहे विविध ढेंडर प्रक्रिया काम अंतिम टप्प्यात आले आहेत. शहराच्या बाह्य भागातुन वाहने जाण्यासाठी काक्रंबा नळदुर्ग बायपास मार्ग वरील रखडलेले व दुरुस्ती कामे करण्याच्या सुचना यावेळी हायवे वाल्यांना दिल्याचे यावेळी सांगितले बाहेर गावाहुन येणाऱ्या पोलिसासह अन्य कर्मचाऱ्यांन साठी मंगल कार्यालय हाँल निवासव्यवस्था केली जाणार आहे. सर्व विभागांना समन्वय साधुन काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत असे शेवटी म्हणाले . ,

 

 पुरातण दगिने अहवालास प्राप्त होण्यास ८ ते १० दिवस लागणार ! देविचे दागदागिने मोजदाद अहवाल माझ्या कडे अधाप प्राप्त झाला नाही माझ्याकडे येण्यास दहा दिवस लागणार आहेत असे सांगुन आम्हाला या प्रकरणी दागदागिने ज्यांच्या कडुन पुरातन दागिने गहाळ वगेरे झाले असतील त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधि दिलि आहे .

 अहवाल फोडले प्रकरणी दोषीवर कारवाई करणार -जिल्हाधिकारी पुरातन देविचे दागदागिने मोजदाद अहवाल फुटी प्रकरणी संबधितांना शोकाँज नोटीस पाठवल्या आहेत कुठल्या वाँटसाप वरुन अहवाल,बाहेर गेला फुटला त्याचा शोध घेवुन बाबतीत सदरील तपास सायबर कडे दिला आहे .
——————————– जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पञकारांशी संवाद तात्काळ अँक्शन पथक शंभर सीसीटीव्ही कँमेरे वाहतुक व्यवस्थेत बदल,पोलिस अधीक्षक कुलकर्णी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीयनवराञ उत्सव सुरक्षा पुर्वतयारी बाबतीत बोलताना पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले की मागील उत्सवातील अनुभव घेता यंदा ञुटीत सुधारणा केली आहेत. शहरावर शंभर सीसीटीव्ही ची नजर असुन बाह्य भागात आणखी लावले जाणार आहेत चोऱ्या मिसींग रोखण्यासाठी क्वीक अँक्शन पथक तयार केलेआहे व हे पथक चोरीची माहीती मिळताच तात्काळ कारवाई सुरु करणार आहे,। यंदा ट्राँफीक नियंञण व वाहनतळे यावर थोडेअधिक लक्ष केंद्रित केले आहे.मागील वर्षचा अनुभव लक्षात घेता यंंदा वाहतुक व्यवस्थेत बदल केले आहेत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यंदा क्यु आर कोडची उपाययोजना केली असुन मुंबई पुणे संभाजीनगर नागपूर येथुन येणाऱ्या वाहन चालकांनी क्युआर कोड स्कँन केला जवळचे वाहनतळ व दिशांचा मँप त्यांच्या मोबाईल वर येणार आहे यंदा हडको वाहनतळात वाहने उभे करणे नियोजन केले आहे काळात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी आम्ही योग्य ती उपाययोजना केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे