‘सगे सोयऱ्यांचा’ शासन निर्णय (GR) काढण्यासह इतर महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा – आ.आमदार राणाजगजीतसिंह पाटील
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

‘सगे सोयऱ्यांचा’ शासन निर्णय (GR) काढण्यासह इतर महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा – आ.आमदार राणाजगजीतसिंह पाटील
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
मराठा संघर्ष योद्धे श्री.मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या अनुषंगाने ‘सगे सोयऱ्यांचा’ शासन निर्णय (GR) काढण्यासह इतर महत्त्वपूर्ण मुद्यांच्या संदर्भाने दि.२० जून रोजी मा.मुख्यमंत्री महोदयांशी आ. अभिमन्यु पवार यांच्यसाह सविस्तर चर्चा झाली. तसेच मनोजदादा जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी तातडीने मंत्रिमंडळातील सदस्यांना पाठवण्यासंदर्भात विनंती करण्यात आली. न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी आवश्यक औपचारिकता जलदगतीने पूर्ण होत असतानाच, काही तातडीचे निर्णय घेण्याविषयी सरकार सकारात्मक आहे, असे मा.मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. सरकार उपोषणासंदर्भात संवेदनशील असून ना.श्री.शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ सदस्यांसह तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील श्री.मनोजदादा जरांगे पाटील यांची भेट घेऊन सरकारच्या भूमिकेविषयी अवगत करणार आहे.