
लोहारा – (प्रतिनिधी)
लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील श्री नृसिंह मंदिरात नवीन नृसिंह मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा सोहळानिमित्त सलग ३ दिवस विविध धार्मिक भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.असून पहिल्या दिवशी (दि.७) सकाळी पुण्य वचन, मातृपुजन,नांदी श्राद्ध, देवता स्थापना ,अग्नी स्थापना ,जलदिवस, देवाची शय्या हे कार्यक्रमाने सुरुवात झाली आहे.
या धार्मिक पूजेनंतर गावातील दानशूर व्यक्तीकडून महाप्रसादाचे आयोजन केले होते. रात्री ९ वाजता ह. भ.प. महेश महाराज माकणीकर यांची किर्तन सेवा संपन्न झाली. दुसऱ्या दिवशी (दि.८) मुख्य देवतेचे हवन,देवाला शय्येतुन उठवणे, पर्यायी होम व उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले. रात्री ९ वाजता ह.भ.प. विठ्ठल महाराज दिवेगावकर यांची किर्तन सेवा संपन्न झाली.शेवटच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.९) श्री. नृसिंह मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.तसेच रात्री ९ वाजता ह.भ.प ज्ञानेश्वर माऊली पठाडे महाराज यांची किर्तन सेवा पार पडली.
या कार्यक्रमाचा तालुक्यातील सर्व श्री. नृसिंह भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सर्व हिप्परगा (रवा) ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.