BRS नेते प्रशांत नवगिरे यांच्या तत्परतेमुळे वाचले एकाचे प्राण

BRS नेते प्रशांत नवगिरे यांच्या तत्परतेमुळे वाचले एकाचे प्राण
जळकोट /न्यूज सिक्सर
दि. ११ रोजी सायंकाळी ७ वा. सोलापूर – हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग ते जळकोट दरम्यान मुर्टापाटी जवळ एका ट्रक व मोटारसायकल चा अपघात होऊन मोटारसायकल वरील दोघे गंभीर जखमी झाले . त्यापैकी एकाच्या पायावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यास मोठी इजा झाली आहे .
यावेळी अवघ्या दोनच मिनिटात याच महामार्गावरून प्रवास करीत असलेले BRS पक्षाचे नेते प्रशांत नवगिरे यांनी तात्काळ ट्रक अडवून त्याची चावी काढून घेतली . क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी अपघातग्रस्तांकडे धाव घेतली आणि त्या दोघांना रस्त्याच्या कडेला हलविले . त्यांना धीर दिला व रुग्णवाहिकेसाठी 108 व 1033 या नंबर वर फोन करून अपघाताच्या ठिकाणची माहिती देऊन तातडीने रुग्णवाहिका पाठविण्याबाबत कळविले .
ट्रॅफिक पोलीसांनाही फोन केला . कांही वेळातच या ठिकाणाहुन उमरगाकडे जाणारे उपविभागीय अधिकारी गणेश पवार हेही थांबुन सर्व परिस्थिती योग्य रितीने हाताळत होते .
ट्रॅफिक पोलीस व टोल प्लाझा येथील रुग्णवाहिका वेळेवर आल्यामुळे अपघातग्रस्तांना पुढील उपचारांसाठी सोलापूर येथे हलविणे सोयीचे ठरले व अपघातग्रस्तांचे प्राण वाचले .
अपघातग्रस्तांची नावे राहुल लक्ष्मण चौगुले व बालाजी पवार अणदूर अशी आहेत . बीआरएस पक्षाचे नेते प्रशांत नवगिरे व उमरगा येथील उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांनी अपघातस्थळी थांबुन अपघातग्रस्तांना केलेल्या मदतीमुळे दोघांचेही सर्वत्र कौतुक केले जात आहे .