आम आदमी पार्टीची तटस्थेच्या भूमिकेत ; महाविकास आघाडीचे उमेदवार अडचणीत – मधुकर शेळके

आम आदमी पार्टीची तटस्थेच्या भूमिकेत ; महाविकास आघाडीचे उमेदवार अडचणीत – मधुकर शेळके
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांने घटक पक्षाला विश्वासात न घेतल्याने मित्रपक्ष आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके तटस्थता भूमिका घेतली आहे. असे तालुक्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक घेवून निर्णय घेतला आहे.
तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दि.४ नोव्हेंबर रोजी अंतिम मुदत असून यानंतर महाविकास आघडीचा कोण उमेदवार राहील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी जिल्ह्यातील आम आदमी पार्टीचा मोठा सिंहाचा वाटा होता. पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी तालुक्यातील मित्र पक्षाला अद्याप तर मान सन्मान दिला नाही विश्वासात घेतले नाही उमेदवारी अर्ज दाखल करताना आमच्या पक्षाचा विचार केला नाही तसेच पोस्टर बॅनर वर पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचा फोटो सुद्धा लावत नाहीत यामुळे आम आदमी पार्टीच्यावतीने विचार करण्याची गरज आहे. लवकरच जिल्ह्यातील पक्षाची बैठक घेऊन आम आदमी पार्टी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. आम आदमी पार्टीची तटस्थेच्या भूमिकेत असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार अडचणीत येणार हे मात्र नक्कीचं.