
लोहारा(प्रतिनिधी)
राज्य शासनाने महाराष्ट्रातील सुशिक्षित पदवीधर बेरोजगार तरुणांना सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून आरोग्य, शिक्षण आदी विभागांत संधी दिली आहे ,मात्र अतिअवशक सेवेच्या ठिकाणी गरजेची बाब म्हणून या प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी नेमणुक द्यावी अशी मागणी या युवा तरुणांची आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुती शासनाने लाडकी बहिण योजना ,एस टी बस सवलत, शेतकरी सन्मान आदी अनेक जनहिताच्या योजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी कोणताही कालावधीत निश्चित केलेला नाही. दरम्यान या योजनेच्या जनजागृतीसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना सुरू केली आहे त्यात राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना तुटपुंज्या वेतनावर काम करण्याकरीता फक्त सहा महिन्यांसाठी शासनाच्या विविध भागात संधी दिली परंतु सहा महिन्यांची अट काढून ती पुढे कायम करावी अशी मागणी स्वतः प्रशिक्षणार्थी आणि त्यांच्या पालकातुन केली जात आहे. परत आम्ही ६ महिन्यानंतर करणार काय ! आम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळावा त्यासाठी कार्यकाळ वाढवून मिळावा म्हणून राज्यातील मायबाप सरकारने या तरुणाचा भविष्याचा विचार करून त्यांची सहा महिन्यांची अट शिथिल करून कायम करावे अशी विनवणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी वर्गातुन केली जात आहे.