श्री तुळजाभवानी मंदिरात आता भक्तांना निर्बंध नाहीत मंदीर संस्थानचे आदेश जारी
श्री तुळजाभवानी मंदिरात आता भक्तांना निर्बंध नाहीत मंदीर संस्थानचे आदेश जारी

श्री तुळजाभवानी मंदिरात आता भक्तांना निर्बंध नाहीत मंदीर संस्थानचे आदेश जारी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानने भाविकांच्या ड्रेस कोडवरून आदेश माघे घेतला आहे. श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानाचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी याबाबतचे जाहीर प्रकटन काढले आहे. श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
श्री तुळजाभवानी मंदिरात कपडे हाफ पॅन्ट, बर्मुडा घालणाऱ्यांना प्रवेश बंद केली होता त्याबाबत बॅनर सुद्धा लावले होते. अंगप्रदर्शन, उत्तेजक असभ्य अशोभनिय वस्त्रधारी, हाफ पॅन्ट, बर्मुडाधारकांना आता मंदिरात प्रवेश नाही. भारतीय संस्कृती व सभ्यत्याचे भान ठेवण्याचे मंदीर संस्थांनने आवाहन करणारे बोर्ड मंदीर परिसरात लावले होते मात्र ती भुमिका अवघ्या सात ते आठ तासात मंदीर संस्थांनाने आदेश मागे घेतली आहे.