जळकोट येथे संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त भव्यदिव्य मिरवणूक संपन्न

जळकोट येथे संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त भव्यदिव्य मिरवणूक संपन्न
जळकोट /न्यूज सिक्सर
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे संत रोहिदास यांच्या ६४६ व्या जयंतीनिमित्त जळकोट येथील चर्मकार समाज बांधवांच्यावतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. जळकोट येथील संभाजीनगर भागातून संत रोहिदास यांच्या जयंतीची मिरवणूक राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष नितीन शेरखाने, माजी जिल्हाध्यक्ष विकास गायकवाड,जिल्हाध्यक्ष गणपती कांबळे,मराठवाडा सचिव बबन वाघमारे, भैरवनाथ कानडे, सोमनाथ बनसोडे, तालुकाध्यक्ष केरनाथ कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रोहिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. गावातून शांततेने ही मिरवणूक निघाली. मुंबई- हैदराबाद महामार्ग, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पटांगण परिसर, नवी पेठ आदी भागातून ही मिरवणूक निघाली. मेडसिंगा येथील कला पथकातील कार्यकर्त्यांनी आपल्या कला सादर केल्या.
संत रोहिदास यांची जयंती व मिरवणूक यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य संजय अंगुले, हनुमंत अंगुले, संतोष वाघमारे, ओमप्रकाश अंगुले, ओम प्रकाश अंगुले,गणेश अंगुले, तानाजी अंगुले, सुरज अंगुले, नागनाथ अंगुले, संतोष अंगुले, माजी सैनिक हनुमंत अंगुले, शिवाजी डांबरे, मोहन डांबरे, महादेव अंगुले, शंकर अंगुले, धनराज अंगुले, विजय अंगुले, मनोज कांबळे, सुनील कांबळे, मुकेश कदम, राहुल धनशेट्टी, विकास डांबरे, बाबुराव अंगुले, दयानंद अंगुले, लक्ष्मण अंगुले, गोटू कांबळे, प्रमोद अंगुले आदि पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव यांनी परिश्रम घेतले.