न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

तुळजाभवानी देवीच्या मंदिरच्याम विकास कामासाठी ५४ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता – आमदार राणाजगजितसिंह पाटील

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

तुळजाभवानी देवीच्या मंदिरच्याम विकास कामासाठी ५४ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता – आमदार राणाजगजितसिंह पाटील

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदीर व परिसराच्या विकासासाठी ५४ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली असुन पुरातत्व विभागाने या कामांची निविदा प्रसिद्ध केली आहे.

तुळजाभवानी मंदीर या राज्य संरक्षित मंदिराच्या जतन व दुरुस्तीसाठी विविध कामे करण्यात येणार असुन यामुळे मंदिराचे पुरातन रूप कायम पुरातत्त्व विभागाच्या मान्यता प्रमाणे करण्यात येणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या पुढाकाराने मंदीर परिसरात ही विकासकामे व आराखडा
मंजुर करण्यात आला आहे.श्री तुळजाभवानी मंदिरातील जतन व दुरुस्ती कामाचे ६ टप्पे करण्यात आले आहेत. यामध्ये पहिला टप्प्यामध्ये भुयारी मार्ग, यज्ञ मंडप, सभा मंडप व भवानी शंकर मंदीर जतन व संवर्धन दुरुस्ती हे ११ कोटी ३६ लाख रुपयांचे काम आहे. २ रा टप्प्यामध्ये भागात कार्यलयीन, प्रशासकीय इमारत, पोलीस चौकी, खुला प्रेक्षक मंच, गोमूख तीर्थ, दत्त
मंदीर, मातंगी मंदीर, कल्लोळ तीर्थ,
निंबाळकर महाद्वार, मार्तंड ऋषी मंदीर,
टोळ भैरव मंदीर, दीप माळ, शिवाजी
महाद्वार व ओवऱ्या, खंडोबा व यमाई मंदीर जतन व दुरुस्ती अशी १२ कोटी ९
लाखांची कामे आहेत.तिसरा टप्पा मध्ये तुकोजीबुवा मठाकडील दगडी संरक्षण भिंत, दगडी फरशी, आवश्यकतेनुसार दगडी पायऱ्या, महावस्त्र अर्पण केंद्र जतन व दुरुस्ती अशी ९ कोटी ४६ लाखांची कामे आहेत.

चौथ्या टप्प्यामध्ये महंत तुकोजी बुवा मठावरील ओव्हऱ्या, आराध्य खोलीवरील ओवऱ्या, आराध्य बसण्यासाठी खोल्या, दगडी फरशी जतन संवर्धन व दुरुस्ती अशी ९ कोटी ४५ लाखांची कामे आहेत, पाचव्या टप्प्यामध्ये मुख्य प्रवेशद्वार व
जिजामाता महाद्वार जतन व दुरुस्तीचे ७ कोटी २१ लाख आणि शेवटच्या सहाव्या टप्प्यांमध
लिफ्ट व रॅम्पचे ४ कोटी २५ लाख असे ५३ कोटी ८४ लाख ४७ हजार ०७ रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे.

पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक यांनी याविषयीचा सविस्तर प्रस्ताव पाठवला होता. मंदीरमधील६ भाग पैकी १ ते ५ यातील नमुद समाविष्ट कामाची निविदा पुरात्तव विभागाने काढली असुन २९ ऑगस्टपर्यंत निविदा भरता येणार आहे . त्यानंतर प्रक्रिया पुर्ण झाल्यावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.श्री तुळजाभवानी मंदिराचे जतन व दुरुस्ती करताना जुने रूप कायम ठेवले जाणार असुन सर्व कामे पुरात्तव विभागाच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार असल्याचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषद मध्ये बोलताना
सांगितले.या कामामुळे मंदीर व तुळजापूरच्या वैभवात भर पडणार असुन पर्यटनाला चालना मिळणार आहे शिवाय नवरात्र, गर्दीच्या दिवशी यात्रेकरूंची व्यवस्था करता येणार आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, शहराध्यक्ष शांताराम पेंदे माऊली भोसले,, बाळासाहेब शिंदे, अमरीश जाधव,किशोर साठे,सागर कदम, पंडित जगदाळे,राम चोपदार,राजेश्वर कदम, ऋषिकेश साळुंखे, अविनाश गंगणे,महादेव रोचकरी,आबा रोचकरी आदि उपस्थित होते.

तीर्थक्षेत्राचे लुक देण्यासाठी तुळजापूर शहरात भव्य नक्षीकाम

तीर्थक्षेत्राचे लुक देण्यासाठी तुळजापूर शहरात भव्य नक्षीकाम आणि कलाकुसर असणाऱ्या ८ स्वागत कमानी करण्यात येणार आहेत आणि राष्ट्रीय महामार्ग लगत शहरात प्रवेश याच कमानीतून होणार आहे . एकूण ८ स्वागत भव्य कमानी करण्यात येणार आहेत या कामाला दि.१ सप्टेंबर पासून कामास सुरुवात करण्यात येईल.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे